दक्षिण आफ्रिका संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना बॉक्सिंग डे म्हणजेच 26 डिसेंबर रोजी सुरू झाला. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांचा हा निर्णय योग्य देखील ठरला. दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या डावात अवघ्या 189 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तर दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने देखील एक विकेट गमावली.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला दक्षिण आफ्रिका संघ अवघी 68.4 षटके खेळून सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को जानसेन (Marco Jansen) याने सर्वाधिक 59 धावा केल्या. तर त्याच्या साथीने काइल व्हेरेने याने 52 धावांची खेळी केली. वरची फळी मोठी धावसंख्या करू शकली नाही, म्हणून आफ्रिकी संघ पहिल्या डावात अवघ्या 189 धावांपर्यंत मजल मारू शकला. सलामीवीर डिन एल्गर 26, तर सारेल एरवी याने 18 धावा करून विकेट्स गमावल्या. परिणामी संघ स्वस्तात सर्वबाद झाला. मध्यक्रमात टेंबा बावुमा (1) आणि खाया झोन्डो (5) यांनी एक आकडी धावसंख्येवर विकेट गमावली.
ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी या पहिल्या डावात जबरदस्त पाहायला मिळाली. त्यांचा युवा अष्टपैलू कॅमरून ग्रीन (Cameron Green) याने अवघ्या 27 धावा खर्च करून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. यासाठी ग्रीनने एकूण 10.4 षटके गोलंदाजी केली आणि संघाला सामन्यात भक्कम स्थितीत पोहोचवले. त्याव्यतिरिक्त मिचेल स्टार्क यानेही 13 षटकांमध्ये 39 धावा खर्च केल्या आणि दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. स्कॉट बोलंड आणि लाथन लायन यांनी देखील प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
आफ्रिकी संघ सर्वबाद झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाला फलंदाजीची संधी मिळाली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 45 धावा केल्या आणि एक विकेट देखील गमावली. सलामीवीर उस्मान ख्वाजा अवघी एक धाव करून बाद झाला. कागिसो रबाडाने त्याची विकेट घेतली. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमरून ग्रीनसाठी 2022 चा शेवटचा खूपच खास ठरला आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2023 च्या लिलिवात ग्रीनसाठी मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी रुपये खर्च केले आणि त्याला संघात सामील केले. ग्रीन आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. अशातच आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत त्याने गुणवत्ता दाखवली आहे. (Innings break, South Africa 189 all out in first innings, Cameron Green takes 5 wickets)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ठरलं तर, श्रीलंकेविरुद्ध भारताचे कर्णधारपद हार्दिककडेच! व्हिडिओ आला समोर
भाऊ पेटलाय! रोहित लागोपाठ दोन दिवसांपासून नेटमध्ये गाळतोय घाम, श्रीलंकेविरुद्ध मिळणार का संधी?






