धरमशाला। आजपासून(15 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. मात्र आज हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवर होणारा पहिला सामना टी20 सामना पावसामुळे रद्द झाला आहे.
हा सामना सुरु होण्याआधीच धरमशाला येथे पाऊस सुरु होता. त्यामुळे या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. अखेर पावसाची सतंतधार सुरु असल्याने हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबद्दल बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली आहे. बीसीसीआयने ट्विट केले आहे की ‘पाऊस सातत्याने सुरु असल्याने आजचा सामना रद्द करण्यात आला आहे.’
आता या टी20 मालिकेतील दुसरा सामना मोहालीला 18 सप्टेंबरला होणार आहे. दुसऱ्या टी20 सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.
The rains continue and the match has officially been called off. See you in Chandigarh for the 2nd T20I #INDvSA pic.twitter.com/BjZ9Y7QAf2
— BCCI (@BCCI) September 15, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–११ धावांवर बाद होत वॉर्नरने मोडला ६१ वर्षांपूर्वीचा नकोसा विक्रम
–…म्हणून चहल, कुलदीपला मिळाली नाही भारताच्या टी२० संघात संधी, विराटने केला खूलासा
–व्हिडिओ: स्टिव्ह स्मिथने एका हाताने घेतलेला हा अफलातून झेल पाहिला का?