भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी२० मालिका (ind vs wi t20 series) बुधवारी (१६ फेब्रुवारी) सुरू झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई (ravi bishnoi) याला या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. बिश्नोईनेही या संधाला साजेसे पदार्शन करून दाखवले आणि सामनावीर ठरला. स्वतःच्या पदर्शनाविषयी बोलताना रवीने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सामन्यात घेतलेल्या २ महत्वाच्या विकेट्ससाठी सामनावीर पुरस्कार मिळाल्यान रवी बिश्नोई म्हणाला की, “आता चांगले वाटत आहे. भारतासाठी खेळणे एक स्वप्न राहिले होते आणि हे चांगले वाटत आहे. सुरुवातीला मी नर्वस होते, पण संघासाठी योगदान द्यायचे होते. कारण, आम्हाला माहिती होते की, वेस्ट इंडीज टी२० क्रिकेटमधील सर्वात मजबूत संघांपैकी एक आहे. दव असल्यावर चेंडू पकडणे थोडे अवघड असते. मी याविषयी (सामनावीर) कधीच विचार केला नव्हता, पण हे माझ्यासाठी स्वप्न प्रत्यक्षात उतल्यासारखे आहे.”
उभय संघातील या पहिल्या टी२० सामन्याचा विचार केला. तर अष्टपैलू वेंकटेश अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे दोघे शेवटपर्यंत नाबाद राहिले. सूर्यकुमार याविषयी बोलताना म्हणाला की, “मी कुठेही फलंदाजी करू शकतो मला सामना संपवायचा होता. जिंकून नाबाद राहिल्यामुळे आनंदी आहे. वेंकटेशसाठीही हा एक वेगळा अनुभव आहे.”
दरम्यान, भारतीय संघासाठी सामन्यात सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी सर्वाधिक धावा केल्या. रोहितने ४०, तर ईशानने ३५ धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहली १७ धावांवर बाद झाला. तर, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत अवघ्या ८ धावा करू शकला. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमारने ३४ धावा केल्या. वेंकटेश अय्यरनेही २४ धावांचे योगदान दिले.
तत्पूर्वी, भारताने सुरुवातील नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीज संघ ७ विकेट्सच्या नुकसानावर १५७ धावा करू शकला. वेस्ट इंडीजसाठी निकोलस पूरनने सर्वाधिक ६१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४ विकेट्सच्या नुकसानावर आणि १८.५ षटकांमध्ये १६२ धावा करून विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘अभी मजा आयेगा ना भिडू..’,श्रेयसला केकेआरचे कर्णधारपद मिळताच चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रीया





