---Advertisement---

गरजेवेळी शार्दुल ठाकुरला कशी मिळते विकेट? गोलंदाजाने स्वतःच केलाय खुलासा

On: रविवार, ऑगस्ट 21, 2022 4:14 PM
mohammad siraj Shardul Thakur
---Advertisement---

झिम्बाब्वेविरुद्धच्या सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. शनिवारी (२० ऑगस्ट) खेळला गेलेला दुसरा एकदिवसीय सामन्यात भारताने ५ विकेट्स राखून जिंकला आणि मालिकेत ०-२ असी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात भारताने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दीपक चाहरच्या जागी शार्दुल ठाकुर याला संधी दिली होती आणि हा निर्णय अगदी योग्य ठरला. शार्दुलने या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली आणि सामना संपल्यानंतर स्वतःच्या गोलंदाजीविषयी महत्वाची माहिती देखील केली. 

शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) याने झिम्बाब्वेविरुद्धच्या या दुसऱ्या सामन्यात ७ षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने ३८ धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. शार्दुलला भारताच्या काही खास गोलंदाजांमध्ये गणले जाते, जे गरजेच्या वेळी संघाला विकेट मिळवून देतात. मालिकेतील पहिल्या सामन्यात तो खेळला नाही, पण दुसऱ्या सामन्यात त्याने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. सामना संपल्यानंतर मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने बीसीसीआय टीव्हीसाठी शार्दुलची मुलाखत घेतली.

दुसऱ्या सामन्यासाठी केकेल्या तयारीविषयी सिराजने त्याला प्रश्न विचारला. याविषयी बोलताना शार्दुल म्हणाला की, “प्लॅन तर प्रत्येकाचा असतो. तू (सिराज) आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी केली. तुमच्या गोलंदाजीची लाईन-लेंथ पाहिली आणि इथे कोणत्या लेंथवर गोलंदाजी करावी लागेल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.”

सिराजने पुढे प्रश्न विचारला की, “लॉर्ड (शार्दुल) मला जाणून घ्यायचे आहे की, तू विकेट कशी घेतोस? जेव्हा कधी येशील तेव्हा तुला विकेट मिळते.” यावर शार्दुल म्हणाला की, “प्रयत्न तर नेहमी विकेट घेण्यायाच असतो. देवाचीही कृपा आहे की, विकेट्स मिळत आहेत, जी चांगली गोष्ट आहे. कारण विकेट घेतले, तरच संघाला फायदा होईल.  विकेट्स घेऊन मॅच विनिंग प्रदर्शन करून्याचा प्रयत्न असतो.” दरम्यान, उभय संघातील तिसरा सामना सोमवारी (२२ ऑगस्ट) हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जाईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एकही तो दिल है, कितनी बार जितोगे! चिमुकल्याच्या विनंतीचा संजूने राखला मान, Video व्हायरल
एकदाची भेट झालीच! केएल राहुलला आदर्श मानणाऱ्या झिम्बाब्वेच्या खेळाडूला अखेर भेटला भारतीय कर्णधार
एशिया कपमधून केले दुर्लक्ष, आता ‘या’ भारतीय शिलेदाराचे धाकड प्रदर्शनासह बीसीसीआयला प्रत्युत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---