क्रिकेटमुळे अनेकांचे आयुष्य बदलले आहे. काही क्रिकेटपटू खूप पुढे गेले. तर काही क्रिकेटपटूंची कारकीर्द सुरू होण्याआधीच संपुष्टात आली. असाच एक क्रिकेटपटू आहे, तिलक वर्मा. ज्याच्या संघर्षाची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे.
तिलक वर्माचे (tilak Verma) वडील इलेक्ट्रीशियन होते. त्यामुळे ते आपल्या मुलाचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकत नव्हते. त्यावेळी त्याची काळजी घेण्यासाठी आणि मदत करण्यासाठी एका प्रशिक्षकाने पुढाकार घेतला. जो एकेकाळी हैदराबादच्या मैदानावर क्रिकेट खेळायचा. तो आता आयपीएल स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना टक्कर देताना दिसून येणार आहे. १९ वर्षीय तिलक वर्माला मुंबई इंडियन्स संघाने १. ७ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे.
तिलक वर्माने या यशाचे संपूर्ण श्रेय आपले प्रशिक्षक सलाम बायश यांना दिले आहे. क्रिकेटच्या गरजा भागवण्यासह, प्रशिक्षण, जेवण आणि गरज पडल्यास राहण्यासाठी घर देखील दिले होते. परिस्थिती हालाखीची असल्यामुळे त्याचे वडील त्याला क्रिकेट ॲकेडमीमध्ये पाठवू शकत नव्हते. असे सर्व असताना देखील तिलक वर्माने घवघवीत यश मिळवलं आहे. निवड झाल्यानंतर तिलक वर्माने म्हटले की, “माझ्याबद्दल काही नाही लिहिलं तरी चालेल, परंतु माझ्या प्रशिक्षकांबद्दल नक्की लिहा..”
तसेच त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १६ लिस्ट ए सामन्यात ५२.३ च्या सरासरीने ७८४ धावा केल्या आहेत. तसेच १५ टी२० सामन्यात २९.३ च्या सरासरीने ३८१ धावा केल्या आहेत. तिलक वर्मा फलंदाजी सह ऑफ स्पिन गोलंदाजी देखील करतो.
आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ
रिटेन खेळाडू – रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह.
ईशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, एम अश्विन, बसिल थम्पी, फॅबियन ऍलन, आर्यन जुयाल, अर्जुन तेंडुलकर, ऋतिक शोकीन, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, अनमोलप्रीत सिंग, अर्शद खान, रिले मेरेडिथ, टिम डेव्हिड, टायमल मिल्स, डॅनियल सेम्स, जोफ्रा आर्चर , संजय यादव, एन तिलक वर्मा, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.
महत्वाच्या बातम्या :
यंदाचा महागडा खेळाडू ठरताच ‘इशान किशन’ लागला नाचू, ‘झिंगाट’वर केला भन्नाट डान्स
एकूण खेळाडू २०४ आणि करोडोंची खैरात! असा राहिला आयपीएलचा मेगा ऑक्शन
चाहते म्हणातायेत, ‘बुमराह-आर्चर चेन्नईची वाट लावणार!’