---Advertisement---

विराट कोहली आणि पृथ्वी शॉ ऐवजी ‘या’ दोन खेळाडूंना मिळावी टीम इंडियात संधी, दिग्गजाची मागणी

---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताच्या आठ विकेटने पराभव केला आहे. सामन्यात पहिले दोन दिवस आघाडीवर असणाऱ्या भारतीय संघाला सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी हा पराभव स्विकारावा लागला.  या पराभवानंतर अनेकांनी भारताच्या पराभवाबद्दल संघ निवडीला जबाबदार धरले आहे.

याच दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉ व विराट कोहली यांच्या जागी अनुक्रमे शुभमन गिल व केएल राहुल यांना संधी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

केएल राहुलला देण्यात यावी संधी 

पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर आता पालकत्व रजा घेऊन विराट कोहली भारतात परतणार आहे. अशा परिस्थितीत चौथ्या क्रमांकावर कोणत्या खेळाडूने खेळावे याबाबत क्रिकेट पंडित वेगवेगळे मत मांडत आहेत. अशातच मॅकग्रा यांनी केएल राहुलला संधी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

पृथ्वी शॉ ऐवजी शुभमन गिलला संधी देण्यात यावी 

भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉला संधी दिली होती. मात्र सामन्यातील दोन्ही डावात पृथ्वी अपयशी ठरल्याने त्याच्याऐवजी युवा फलंदाज शुभमन गिलला संधी देण्यात यावी अशी मागणी ग्लेन मॅग्रा यांनी केली आहे.

दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना 26 तारखेपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे सुरू होणार आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थित अजिंक्य रहाणे भारताचे कर्णधारपद भूषविणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ कशाप्रकारे पुनरागमन करतो याकडे संपूर्ण क्रिकेट वर्तुळाचे लक्ष असेल.

महत्त्वाच्या बातम्या –

‘विरुष्का’च्या पहिल्या भेटीचा रोमांचक किस्सा, पाहा कुठे आणि कसे जुळले नाते

तीन भारतीय शिलेदार ज्यांनी कसोटीत सर्वात कमी डावात केल्या १००० धावा पूर्ण

बीसीसीआयने तातडीने द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवावे, ‘या’ भारतीय दिग्गजाचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---