दुध दरवाढीसह विविध मागण्यांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरु केले आहे.
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्यांसह आंदोलकांनी दुधाचे टँकर रोखले आणि पुणे-बंगळुरू महामार्गावर त्यांना फोडून रिकामे केले आहेत. त्यामुळे हजारो लिटर दूध वाया गेले आहे.
या आंदोलनाचे सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे. याप्रकरणाबद्दल नुकतेच भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने ट्विट करत त्याचे मत व्यक्त केले आहे. त्याने म्हटले आहे की “तुम्ही तूमच्या मागण्या लावून धरा. त्यासाठी लढा. आंदोलन करा. परंतु दूध वाया घालवण्यापेक्षा ते गरजू मुलांना द्या.”

आकाश चोप्राच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया देत त्याच्या मताला पाठिंबा दिला आहे, तर अनेकांनी विरोधही केला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
कुणी काहीही म्हणो, पंतने आपल्या खेळात बदल करायला नको!
ब्रेकिंग- ठरलं तर! आयपीएल २०२० होणार, ती देखील या देशात
या पाकिस्तानी खेळाडूचा सलग चौथ्यांदा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह; प्रशिक्षक मिस्बाह म्हणाला…






