पुणे : एसएनबीपी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने रविवारी (30 ऑक्टोबर) येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन पुणे ग्रामीण हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अर्थात, त्यांना विजेतेपदासाठी टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला.
मोशी-चिकली येथील डॉ. दशरथ भोसले हॉकी मैदानावर झालेला अंतिम सामना नियोजित वेळेत गोलशून्य बरोबरीत सुटला होता. त्यानंतर घेण्यात आलेल्या पेनल्टी शूट-आऊटमध्ये टिकाराम महाविद्यालयाचा एसएनबीपी महाविद्यालयाने ४-३ असा पराभव केला. शूट-आऊटमध्ये एसएनबीपीकडून आदित्य रसाला, यश अंगूर, राहुल रसाला, करण दुर्गा, तर टीजे कॉलेजसाठी अब्दुल सलामानी, निखिल भोसले, अनिल कोळेकर यांनी गोल केले.
एसएनबीपीच्या संकेत पाटोळे, तर टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या सचिन कोळेकर आणि मुजावर रायसे यांचे प्रयत्न फोल ठरले. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत एसएनबीपीने ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा ८-० आणि टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाने डी.वाय.पाटील महाविद्यालयाचा ४-० असा पराभव केला. ही स्पर्धा चार संघांमध्ये बाद पद्धतीने खेळवण्यात आली.
निकाल –
अंतिम: एसएनबीपी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय: 0(४) (आदित्य रसाला, यश अंगूर, राहुल रसाला, करण दुर्गा) वि.वि. टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय: 0(३) (अब्दुल सलामानी, निखिल भोसले, अनिल कोळेकर). मध्यंतर ०-०
उपांत्य फेरी – एसएनबीपी ८ (आदित्य रसाला 1ले, 17वे, 32वे, राहुल रसाला ४थे, 29वे, 37वे, यश अंगीर 18वे, करण दुर्गा 21वे) वि.वि. एसीएस, नारायणगाव: 0. मध्यंतर 6-0
टिकाराम जगन्नाथ कॉलेज: ४ वि.वि. डी.वाय. पाटील कॉलेज: 0
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक पंड्या पुन्हा बनला भारताचा कर्णधार, स्वतः बीसीसीआयने सोपवलीये जबाबदारी
ब्रेकिंग! न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी बीसीसीकडून एकूण चार संघांची घोषणा