ऑगस्ट 13, हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय ‘लेफ्ट हॅण्डर डे’ म्हणजेच डावखुऱ्यांचा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे केवळ भारतच नाही तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू जे डाव्या हाताचे आहेत ते सोशल मीडियावर चर्चेत होते.
आंतरराष्ट्रीय लेफ्ट हँडर्स डेचा इतिहास
लेफ्ट हॅण्डर्स क्लबद्वारे 13 ऑगस्ट 1992 रोजी प्रथमच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्याचा उद्देश डाव्या हातांच्या या अद्वितीय गुणवत्तेचा आनंद साजरा करणे, तसेच लोकांना त्याचे फायदे आणि तोटे याबद्दल जागरूक करणे हा होता. 1976 मध्ये डीन आर कॅम्पबेल यांनी प्रथम साजरा केला. तेव्हापासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
हा दिवस साजरा करण्याचा उद्देश
हा दिवस साजरा करण्याचा पहिला हेतू जगभरातील लोकांना जागरूक करणे आहे की, डावखुरे लोक कोणत्याही अर्थाने उजव्या हातांचा अधिक वापर करणाऱ्या लोकांपेक्षा वेगळे नाहीत. ते त्यांचे सर्व काम उजव्या हातांनी सहजतेने करू शकतात.
डावखुऱ्या क्रिकेटपटूंनी क्रिकेटमध्ये केले आहेत मोठ-मोठे विक्रम
क्रिकेटमध्येही आत्तापर्यंत अनेक असे खेळाडू आहेत, जे डावखुरे आहेत. या खेळाडूंनी आपल्या डाव्या हाताची करामत दाखवत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. तसेच जगभरात आपले नाव मोठे केले आहे. या लेखातूनही अशा काही डावखुऱ्या क्रिकेटपटूंबद्दलच्या विशेष आकडेवारीवर नजर टाकू.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे डावखुरे भारतीय गोलंदाज –
610: झहीर खान
520: रविंद्र जडेजा
301: इरफान पठाण
280: रवी शास्त्री
273: बिशनसिंग बेदी
235: आशिष नेहरा
227: कुलदीप यादव
162: विनू मांकड
156: वेंकटपती राजू
154: मनिंदर सिंग
148: युवराज सिंग
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे जगातील डावखुरे गोलंदाज
916: वसीम अक्रम
761: चामिंडा वास
705: डॅनियल व्हिटोरी
610: झहीर खान
678: शाकिब अल हसन
590: मिशेल जॉन्सन
525: रंगना हेराथ
578: ट्रेंट बोल्ट
625: मिशेल स्टार्क
520: रविंद्र जडेजा
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारे डावखुरे फलंदाज
28016: कुमार संगकारा
22358: ब्रायन लारा
21032: सनथ जयसूर्या
20988: शिवनारायण चंद्रपॉल
19593: ख्रिस गेल
18575: सौरव गांगुली
17698: ऍलन बॉर्डर
17236: ग्रॅमी स्मिथ
15737: ऍलिस्टर कुक
15461: ऍडम गिलख्रिस्ट
15319: स्टॅफिन फ्लेमिंग
15205: तमिम इकबाल
15066: मॅथ्यू हेडन
महत्त्वाच्या बातम्या –
डावखुऱ्या भारतीय खेळाडूंची ड्रीम ११; पाहा कोण आहे यष्टीरक्षक
बापरे! एकाच सामन्यात ११ पैकी ७ डावखुरे क्रिकेटर खेळले होते टीम इंडियाकडून




