सध्या इतर देशांप्रमाणे भारतातही कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. यादरम्यान आपण अनेक घटना घडताना पाहिल्या आहेत. ज्यामध्ये काही लोकांनी लॉकडाऊनमध्ये लग्न केले आहे. यामध्ये भारताची आंरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू अंशू तोमर आणि राष्ट्रीय कुस्तीपटू धर्मेंद्र यादव यांचाही समावेश आहे.
अंशू (Anshu Tomar) बऱ्याच काळापासून नंदनी नगर गोंडा स्टेडिअममध्ये राष्ट्रीय संघाच्या इतर कुस्तीपटूंबरोबर सराव करत होती. येथेच तिची भेट महाराजगंजचा राष्ट्रीय कुस्तीपटू धर्मेंद्रबरोबर (Dharmendra Yadav) झाली. मागील ४ वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते. येथून त्यांच्या लग्नाविषयीची चर्चा सुरु झाली.
कोरोना व्हायरसमुळे देशात १७ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. तरी यापूर्वी लग्नाची तारिख ५ मे रोजीच निश्चित झाली होती. त्यामुळे दोन्ही परिवारांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत हे लग्न पार पाडण्याचा निर्णय घेतला.
अंशू आणि धर्मेंद्र यांनी मंगळवारी (५ मे) लग्न केले आहे. आपल्या लग्नात त्यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले आहे. धर्मेंद्र आपल्याकडून केवळ २ व्यक्तींना घेऊन अंशूच्या घरी पोहोचला होता. तिथे त्याने अंशूबरोबर लग्न (Marriage) केले.
धर्मेंद्र आणि अंशू यांनी मास्क घालून लग्नाच्या सर्व विधी पूर्ण केल्या. विशेष म्हणजे या दोघांच्या परिवारातील इतर सदस्यांनी लग्नाच्या सर्व विधी व्हिडिओ कॉलिंगच्यामार्फत पाहिली. परंतु या लग्नाची शूटीगं करण्यासाठी कॅमेरामॅन आणि व्हिडिओग्राफर लॉकडाऊनमुळे उपस्थित नव्हते. त्यामुळे सर्व कार्यक्रम मोबाईलच्या सहाय्याने शूट करण्यात आला.
ट्रेंडिंग घडामोडी-