पुणे : सेंट व्हिन्सेंट आणि जे. एन. पेटिट हायस्कूल यांच्यात जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण विभाग (पुणे मनपा) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या गटाची अंतिम लढत रंगणार आहे.पुणे : सेंट व्हिन्सेंट आणि जे. एन. पेटिट हायस्कूल यांच्यात जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण विभाग (पुणे मनपा) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या गटाची अंतिम लढत रंगणार आहे.
एसएसपीएमएस मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट व्हिन्सेंट संघाने हचिंग्ज स्कूलवर १-०ने मात केली. यात लढतीच्या चौदाव्या मिनिटाला झेफी मेनेजेसने गोल करून सेंट व्हिन्सेंटला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून सेंट व्हिन्सेंटने अंतिम फेरी गाठली. दुसºया उपांत्य लढतीत पेटिट हायस्कूलने कॅम्पच्या द बिशप्स स्कूलवर २-०ने मात केली.
यात लढतीच्या पाचव्या मिनिटाला वेदांत मुतकेकरने गोल करून पेटिटला आघाडी मिळवून दिली. यानंतर २१व्या मिनिटाला आदित्य पाटीलने गोल करून पेटिटची आघाडी २-०ने वाढवली. ही आघाडी कायम राखून पेटिटने अंतिम फेरी गाठली.
निकाल : १९ वर्षांखालील मुले – १) लॉयला हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज – २ (श्रीपाद दोरगे ११ मि., मानस निम्हण २० मि.) वि. वि. डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज – ०.
२) एम. एम. सी. सी. वि. वि. अरिहंत आर्टस कॉमर्स सायन्स कॉलेज. निर्धारित वेळेत ०-०. टायब्रेकमध्ये ५-४ (एमएमसीसीकडून नील शाह, ऋषीकेश ताकवले, सिद्धान्त ताकवले, वीरेंद्र परदेशी, आयुष कोल्हे यांनी गोल केले, तर अरिहंत कॉलेजकडून अभिषेक पाटील, अरविंद बेटकेरी, परमजितसिंग, विकी पुजारी यांनाच गोल करता आले.
३) एस. डी. कटारिया हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज-१ (प्रतिक कदम १८ मि.) वि. वि. यशवंतराव मोहिते विद्यालय – ०.