---Advertisement---

VIDEO: चुटकी वाजवून फलंदाजाला केले आऊट, इंग्लिश क्रिकेटमध्ये चीटिंग! अधिकृत चौकशी सुरू

On: मंगळवार, जुलै 28, 2026 6:58 PM
---Advertisement---

क्रिकेटमध्ये चेंडूशी छेडछाड केल्याचे गंभीर प्रकार झाले आहेत. कधीकधी फलंदाजांना बाद करण्यासाठी बनावट क्षेत्ररक्षणही वापरले देले आहे. आता मात्र एका नव्या प्रकारची फसवणूक समोर आली आहे. ही घटना इंग्लिश क्लब क्रिकेटमध्ये घडली आहे.

झाले असे की, एका क्षेत्ररक्षकाने चेंडूची कड लागल्याचा बनाव केला आणि विकेटकीपर जोश बोव्सने झेल घेतला. फलंदाजाला बाद देण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याची अधिकृत चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

फसवणूक केल्याच्या आरोपानंतर नॉर्थ यॉर्कशायर आणि साउथ डरहॅम क्रिकेट लीगने सॉल्टबर्न आणि नॉर्टन यांच्यातील सेकंड इलेव्हन डिव्हिजन 2 सामन्याची चौकशी सुरू केली आहे.

सामन्यावेळी ‘बनावट एज’ची घटना घडली, ज्यामध्ये सॉल्टबर्न क्रिकेट क्लबच्या सेकंड इलेव्हनवर अप्रामाणिकपणाचा आरोप ठेवण्यात आला. व्हिडिओमध्ये दिसते की, चेंडू फलंदाजाच्या बॅटजवळून जात असताना, फर्स्ट स्लिपमधील सॉल्टबर्नचा क्षेत्ररक्षक झेलबाद झाल्याचे भासवण्यासाठी चुटकी वाजवत होता, ज्यामुळे फलंदाज (नोमान शब्बीर) बाद झाला.

पंचांनी बाद दिल्याने फलंदाज अस्वस्थ दिसला आणि तो आवाज जवळच्या क्षेत्ररक्षकाकडून आल्याचा आरोप त्याने केला, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तो सामना सॉल्टबर्नने 159 धावांनी जिंकला आणि डिव्हिजन 2 च्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले.

सामन्यानंतर त्या फलंदाजाच्या बाद होण्याच्या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच अशा प्रकारच्या आणखी घटना घडल्याचे समोर आल्या आहेत. याची अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मिडल्सब्रो सेकंड इलेव्हनचा कर्णधार रॉरी कॉटरिलच्या म्हणण्यानुसार, सॉल्टबर्नने 29 धावांनी जिंकलेल्या त्या सामन्यावेळी अशाच प्रकारच्या दोन घटना घडल्या होत्या. तो म्हणाला की, तो नॉन-स्ट्राईकच्या एंडला उभा असल्याने त्याला नेमके काय झाले हे लक्षात आले नाही. नंतर सामन्यांचे काही फुटेज समोर आले, ज्यामुळे खेळाडू आणि समर्थकांनी सॉल्टबर्नच्या मागील काही घटनांची चौकशी सुरू केली.

लीगने चौकशी सुरू केली
नॉर्थ यॉर्कशायर आणि साऊथ डरहॅम क्रिकेट लीगने त्यांना या घटनांबाबत अधिकृत तक्रार मिळाल्याची पुष्टी केली आहे. तसेच त्यांनी चौकशीही सुरू केल्याचे स्पष्ट केले.

लीगने त्यांच्या अधिकृत विधानात म्हटले की, शनिवारी डव्हिजन 2 च्या सामन्यादरम्यान घटलेल्या घटनांबाबत लीगला एक अधिकृत तक्रार मिळाली आहे. चौकशी सुरू झाली असून जोपर्यंत औपचारिक प्रक्रिया पूर्ण नाही होत, तोपर्यंत कोणतेही भाष्य केले जाणार नाही. (Investigation launched into english club cricket cheating row over finger-clicking and batsman out video viral)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---