---Advertisement---

‘रिषभ माझ्या अपेक्षांवर खरा उतरला नाही’, म्हणत पाकिस्तानी क्रिकेटरने यष्टीरक्षकाच्या फलंदाजीवर उचलले बोट

On: शुक्रवार, नोव्हेंबर 19, 2021 11:50 PM
Rishabh-Pant
---Advertisement---

भारतीय संघाने बुधवारी (१७ नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेतील पहिला विजय मिळवला. भारतीय संघाच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने महत्वाची भूमिका पार पाडली. त्याने शेवटच्या षटकात विजयी चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. असे असले तरी पाकिस्तान संघाचे माजी दिग्गज कर्णधार इंजमाम उल हक मात्र पंतवर नाराज आहेत. रिषभने या सामन्यात १७ चेंडूत १७ धावा केल्या आणि संघाच्या विजयात महत्वाचे योगदान दिले. तरी इंजमाम मात्र रिषभच्या प्रदर्शनाकडे एका वेगळ्याच दृष्टीने पाहत आहेत.

पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमाम म्हणाले की, “माझ्या मते रिषभ यष्टीरक्षक धोनीप्रमाणेच फलंदाजीमध्ये ५-६ व्या क्रमांकावर कमाल करू शकतो. पण मागच्या काही काळात त्याने आपल्या फलंदाजीने जास्त प्रभावित केलेले नाही.” दरम्यान, रिषभ पंत मागच्या काही काळापासून एकही मोठी खेळी करू शकलेला नाही, याच पार्श्वभूमीवर इंजमाम यांनी हे विधान केले आहे.

ते पुढे म्हणाले की, “पंतकडून मला खूप जास्त आपेक्षा होत्या. ज्याप्रकारे त्याने मागच्या दोन वर्षात प्रदर्शन केले, ते पाहून मी त्याला खूपच वरच्या पातळीचा फलंदाज समजतो.”

इंजमाम पुढे म्हणाले की, “मी त्याला ऑस्ट्रेलिया आणि नंतर यावर्षीच्या सुरुवातीला इंग्लंड विरुद्ध खेळताना पाहिले आहे. पंत याठिकाणी वेगळ्याच वातावरणात खेळला. मला वाटते की तो एमएस धोनीसारखा फलंदाज आहे. जेव्हा वरची फळी अयशस्वी ठरते, तेव्हा तो खालच्या फळीत येऊन आव्हान स्वीकारतो. मला वाटते की पंत अशाच काहीशा प्रकारचा खेळाडू आहे. पण विश्वचषकादरम्यान, तो माझ्या अपेक्षांना पात्र ठरला नाही. मी नेहमीच पंताला एक वरच्या पातळीचा खेळाडू मानतोय कारण त्याने त्याच्या छोट्याश्या कारकिर्दीत दबावात अनेकदा चांगली खेळी केली आहे. पण अलीकडच्या काळात तो असे प्रदर्शन करण्यामध्ये अपयशी ठरला आहे.”

इंजमामने अशी अशा व्यक्त केली की, पंत येणाऱ्या काळात नक्कीच सुधार करेल. इंजमाम म्हणाले की, “विश्वचषकादरम्यान पंत दबावात दिसला. तो यापूर्वीही दबावात दिसला आहे. पण त्याने नेहमी दबावावर पलटवार केला आहेय पण अलीकडच्या काळात तो माझ्या अपेक्षांवर खरा उतरला नाही. पंतने १७ चेंडूत १७ धावा केल्या, पण त्याची फलंदाजी पाहायला मजा येते. पंतला हे अनुभवावे लागेल. मला विश्वास आहे की, तो सुधार करेल.”

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ ३ दिग्गजांकडून चाहत्यांना होत्या खूप अपेक्षा, पण टी२० विश्वचषकात ठरले सपशेल फ्लॉप

देवा, असाच खेळत राहा! चालू सामन्यात प्रेक्षकाची मैदानावर धाव, थेट रोहितपुढे घातला दंडवत-Photo

विराटला मागे टाकत गप्टिल बनला टी२० क्रिकेटचा नवा बादशाह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---