---Advertisement---

‘या’ कारणामुळे पाकिस्तानला न्यूझीलंडमध्ये विजय मिळवणे आहे अवघड, माजी खेळाडू इंजमाम उल-हकचे मत

On: रविवार, डिसेंबर 13, 2020 3:39 PM
---Advertisement---

सध्या पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे आणि तेथे कोरोना संकटाशी झुंज देत आहे. यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि निवड समितीचे प्रमुख इंजमाम उल हक म्हणाला की, पाकिस्तानच्या खेळाडूंना न्यूझीलंडच्या परिस्थितीनुसार स्वतःला सावरणे सोपे असणार नाही.

न्यूझीलंडच्या वातावरणाशी जुळवून घेणे अवघड
शनिवारी इंजमाम माध्यमाशी बोलताना म्हणाला, “पाकिस्तानच्या खेळाडूंना तिथे विकेटच्या अनुसार स्वतःला सावरणे अवघड असणार आहे.” त्यापुढे तो म्हणाला, “संघाला न्यूझीलंड मध्ये विजय मिळवणे सोपे असणार नाही. परंतु इंजमामने संघात नवीन खेळाडूंचा समावेश केल्याने त्यांची स्तुती केली आणि तो म्हणाला, “अनुभवच संघाला विजयाच्या दिशेने घेवून जाईल.”
50 वर्षीय इंजमाम म्हणाला, “न्यूझीलंडमध्ये सर्वात पहिल्यांदा अनुभव येतो. जर आपण नवीन खेळाडूंसोबत घेवून खेळतो, तर विजय मिळवणे अवघड होईल.” न्यूझीलंड दौर्‍यावर गेलेल्या पाकिस्तानच्या संघातील दहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्याचबरोबर खेळाडूंनी तेथील स्थानिक नियमाचे उल्लंघन केले होते. यामुळे न्यूझीलंडच्या अधिकार्‍यांनी पाकिस्तानसाठी क्वारंटाइन नियम कडक करण्यात आले होते.

पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमामने न्यूझीलंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूकडून कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आणि म्हणाला खेळाडूंना या पासून वाचले पाहिजे. परंतु त्याने पाकिस्तानच्या खेळाडूंच्या त्या विचाराचे समर्थन केले की, ज्यामधे खेळाडू म्हणाले होते की क्वारंटाइनमध्ये राहणे अवघड आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) सातत्याने समी असलम सारख्या गुणवान युवांना गमावत चालली आहे. कारण या खेळाडूंना पीसीबीने समर्थन दिले नाही. असलम याने पाकिस्तानसाठी 13 कसोटी आणि 4 वनडे खेळले आहेत. त्याने नुकतेच पाकिस्तानला सोडून अमेरिकामध्ये मेजर लीग खेळण्याचा निर्णय घेतला आहे. इंजमाम यावर म्हणाला, “असलमने असे पाऊल उचलायला नको होते आणि त्याने व्यवस्थेवर विश्वास ठेवायला हवा होता. असलम एक चांगला क्रिकेटपटू आहे. व्यवस्थेने खेळाडूंना पाठींबा द्यायला हवा.” न्यूझीलंड दौर्‍यावर पाकिस्तान संघ 18 ते 22 डिसेंबर पर्यंत तीन टी-20 आणि त्यानंतर 26 डिसेंबर पासून दोन सामन्याची कसोटी खेळणार आहे.

संबंधित बातम्या:
– मोठी बातमी! न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाहेर
– पाकिस्तान क्रिकेटला अच्छे दिन, तब्बल १४ वर्षांनी हा संघ करणार पाकिस्तान दौरा
– शेम टू शेम.! वाॅर्नरने घेतलं सुलतानचं रूप; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---