आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाला उपांत्य सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या या उपांत्य सामन्यात भारत 10 विकेट्सने पराभूत झाला. पराभवानंतर भारतीय संघ टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहेच. पण कर्णधार रोहित शर्मा इतरांच्या तुलनेत अधिक ट्रोल होताना दिसतो. अशातच पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमाम उल हक यांनीही रोहितवर निशाणा साधला आहे. त्यांच्या मते रोहितच्या चेहऱ्यावर आशिया चषक 2022 पासून चिंता दिसत आहे आणि संघावरही या गोष्टीचा परिणाम होत आहे.
कर्णधार म्हणून रोहित खूपच थंड
इंजमाम उल हक माध्यमांशी बोलताना रोहितविषयी नाराजी व्यक्त करताना दिसले. ते म्हणाले, “इंग्लंडने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात सोपा उपांत्य सामना खेळला आहे. मी अंदाजे मागच्या एका वर्षापासून ही गोष्ट जाणवत आहे. भारत एक खूप मोठा संघ आहे, पण कर्णधाराची देहबोली संघावर परिणाम करते. रोहितच्या चेहऱ्यावर खूप चिंता दिसते. तो खूपच थंड व्यक्ती आहे. त्याच्या चेहऱ्यावर दबाव दिसून येतो. त्याची हीच देहबोली संघात देखील उतरली आहे. कर्णधार जर दबावात असेल, तर संघ देखील दबावात येतो.”
आशिया चषकापासून रोहित शर्मा दबावात
इंजमामच्या मते विराट कोहली भारताचे नेतृत्व करत असताना त्यांने संघात चांगली सकारात्मकता आणली होती. इजमाम पुढे बोलताना म्हणाले की, “कर्णधाराच्या रूपात विराटने संघात सकारात्मकता आणली होती. इतर खेळाडू चांगले आहेतच, पण विराटमध्ये त्यांच्यापेक्षा खूप फरक आहे. उपांत्य सामन्यात भारताच्या पराभवाचे मला वाईट वाटले. दोन्ही आशियाई संघांनी टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळावा, अशी माझी इच्छा होती. मला रोहित खूप दबावाद दिसला. सामना जिंकण्याविषयी त्याच्या मनात चिंता होती, जी त्याच्या देहबोलीतून दिसत होती. आशिया चषकापासून (Asia Cup 2022) मी पाहत आहे, रोहित दबावात दिसत आहे. कर्णधाराच्या रूपात त्याचे स्वतःचे प्रदर्शन देखील बदलले आहे.”
दरम्यान, टी-20 विश्वचषकात रोहित शर्माची बॅट अपेक्षेपेक्षा शांतच होती. त्याने सहा डावांमध्ये अवघ्या 19.33 च्या सरासरीने 116 धावा केल्या. यादरम्यान 53 धावा ही त्याची सर्वात मोठी खेळी होती. भारताने ग्रुप स्टेजमधील पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकत ग्रुप दोनमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता. पण उपांत्य सामन्यात गोलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे संघ पराभूत झाला आणि विश्वचषक विजयाचे स्वप्न देखील जागीच धूळीत मिळाले. (Inzamam Ul Haq says Rohit Sharma was in pressure from Asia Cup and his body language is not good for team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या माजी खेळाडूने व्यक्त केले मत, ‘हा’ खेळाडू धोनीच्या पाऊलखुणांवर चालतोय
पिक्चर अभी बाकी है! पॉलीने सांगितले भविष्यातील प्लॅनिंगविषयी, मुंबई इंडियन्समध्ये दिसणार ‘या’ नव्या भुमिकेत