सध्या जगभरात रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाची चर्चा आहे. या युद्धामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले जातेय. शक्तिशाली रशियाने मागील एक आठवड्यापासून युक्रेनवर आक्रमण केले आहे. रशिया सरकारच्या या निर्णयामुळे रशियन लोकांना आर्थिक तसेच विविध संकटांचा सामना करावा लागतोय. रशियन सरकारच्या या निर्णयाचा फटका आता रशियन फुटबॉल संघाला बसला आहे. रशियन फुटबॉल संघ तसेच रशियन फुटबॉल क्लब यांना कोणत्याही प्रकारच्या फूटबॉल स्पर्धांमध्ये भाग घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेनंतर आता फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफा (FIFA) व युरोपियन फुटबॉलची सर्वेसर्वा UEFA यांनी रशियन राष्ट्रीय संघ, रशियन फुटबॉल क्लब, रशियन खेळाडू आणि अधिकाऱ्यांवर बंदी घातली आहे.
UEFA ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे,
‘फुटबॉल येथे पूर्ण एकता आणि युक्रेनमध्ये बाधित झालेल्या सर्वांशी एकजुटीने उभा आहे. दोन्ही संघटनांच्या अध्यक्षांना खात्री आहे की, युक्रेनमधील परिस्थिती झपाट्याने सुधारेल. जेणेकरुन फुटबॉल पुन्हा लोकांमध्ये एकता आणि शांततेचे माध्यम बनू शकेल.’
UEFA ने पुढे आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही रशियाशी संबंध तोडतोय आणि त्यांना सर्व स्पर्धांमधून काढून टाकतो. हा निर्णय UEFA चॅम्पियन्स लीग, UEFA राष्ट्रीय संघ सामने आणि UEFA युरो 2024 साठी देखील लागू आहे.” तसेच फिफानेही रशिया संघावर आगामी फुटबॉल विश्वचषक खेळण्यावर बंदी घातली आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना दिलेला ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ पुरस्कार माघारी घेतला आहे. तसेच, रशियाच्या सर्व अधिकाऱ्यांना देखील बरखास्त करण्यात आले आहे. फिनलॅंडने ते यजमानपद भूषवत असलेल्या आइस हॉकी विश्वचषकात रशियाला सामील न होण्याचा सल्ला दिला. अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय खेळाडूंना देखिल या घटनेचा निषेध केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल सुरू होण्याआधीच नवख्या गुजरात टायटन्सला हादरा! करोडपती खेळाडूचा खेळण्यास नकार (mahasports.in)