---Advertisement---

“कणखर राहा आणि संयम ठेव”, भारतीय प्रशिक्षकाचा सूर्यकुमार यादवला सल्ला

On: गुरूवार, ऑक्टोबर 29, 2020 11:51 AM
---Advertisement---

भारताचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवने इंडियन प्रीमिअर लीगच्या 13 व्या हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्या फलंदाजीमुळे क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजही प्रभावित झाले आहे. मात्र, सातत्याने चांगली कामगिरी करूनही नोव्हेंबर 2020 मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नाही. यातच भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी त्याला संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

आयपीएलच्या 13 व्या हंगामात केली उत्कृष्ट कामगिरी
सूर्यकुमार यादवने आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 12 सामन्यात 40.22 च्या सरासरीने 362 धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्स कडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सलामीवीर क्विंटन डिकॉकनंतर दुसऱ्या स्थानी आहे.

या हंगामात झळकावले तिसरे अर्धशतक
सूर्यकुमारने बुधवारी (28 ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या सामन्यात 43 चेंडूत 79 धावांची धडाकेबाज खेळी केली. यादवचे आयपीएलच्या हंगामातील हे तिसरे अर्धशतक होते. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने हा सामना सहजपणे जिंकला.

रवि शास्त्री यांनी दिला संयम राखण्याचा सल्ला

बेंगलोरविरुद्धच्या सामन्यातील त्याचा फोटो ट्विट करत रवि शास्त्री म्हणाले की, “सूर्य नमस्कार. मजबूत राहा आणि संयम ठेव”

सूर्यकुमारला भारतीय संघात अद्यापही मिळाली नाही संधी
30 वर्षीय सूर्यकुमार यादवला अद्यापही भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. सातत्याने चांगली कामगिरी करूनही निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे मत अनेक दिग्गजांनी व्यक्त केले आहे.

देशांतर्गत क्रिकेटमधील कारकीर्द
त्याची देशांतर्गत क्रिकेट सामन्यांमधील कामगिरीही चांगली आहे. त्याने 77 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 44.01 च्या सरासरीने 5326 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, यादवने अ दर्जाच्या सामन्यांमध्ये 35.26 च्या सरासरीने 2447 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने दोन शतके आणि 15 अर्धशतके झळकावली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

भारतीय संघाची जर्सी घालण्यासाठी सुर्यकुमारने अजून काय करायला पाहिजे? माजी क्रिकेटपटू संतापला

सुर्यकुमारवर बेंगलोरविरुद्धच्या विजयी खेळीनंतर सचिन, शास्त्रींसह ‘या’ दिग्गजांनी केला कौतुकाचा वर्षाव, पाहा ट्विट्स

मी आहे ना! विजयानंतर सूर्यकुमार यादवने संघातील खेळाडूंकडे पाहून केला इशारा, पाहा व्हिडीओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---