रविवारी(१ नोव्हेंबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या संघात आयपीएल २०२०चा ५४ वा सामना पार पडला. या सामन्यात कोलकाताने ६० धावांनी विजय मिळवला. हा त्यांचा ७ वा विजय होता. त्यामुळे त्यांनी १४ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. सध्या आयपीएलच्या प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्सने प्रवेश केला आहे. पण अंतिम ३ जागांसाठी ४ संघात अजूनही चूरस आहे. यात कोलकाताचाही संघ आहे.
असे आहे कोलकातासाठी प्लेऑफचे समीकरण –
राजस्थान रॉयल्सवर मिळवलेल्या विजयासह कोलकाताने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. असं असलं तरीही त्यांचं प्ले-ऑफमधलं स्थान अद्याप निश्चीत झालेलं नाही. सोमवारी(२ नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या सामन्यात बंगळुरुचा संघ २२ किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी हरला, किंवा दिल्लीचा संघ १८ किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी हरला तरच कोलकाता नाईट रायडर्सचा संघ प्ले-ऑफमध्ये दाखल होऊ शकतो.
या दोन्ही शक्यतांव्यतिरीक्त सामन्याचा निकाल अखेरच्या षटकांत लागला तर दिल्ली आणि बेंगलोर हे दोन्ही संघ प्ले-ऑफमध्ये दाखल होतील. असं झाल्यास यानंतर कोलकाताला ३ तारखेच्या सामन्यात मुंबईने सनरायझर्स हैदराबादवर मात करण गरजेचं ठरणार आहे.
प्लेऑफचे सामने ५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
World Cup 11: अंतिम सामन्यातील धोनीच्या षटकारावर जॉस बटलरने दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…
पॅट कमिन्सने साकारला कोलकाताचा ‘रॉयल’ विजय; प्लेऑफमधून राजस्थानचा पत्ता कट
गर्वाचे घर खाली! सहज ट्वीट सेव्ह करतो म्हणणारा राजस्थान संघ पडला तोंडघशी; ट्रोलर्सनी धरलं धारेवर
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’