---Advertisement---

आयपीएलचा बाप तो बापच! शून्यावरती ३ बाद, मुंबईकडूनच मुंबईकरांची दांडी गुल

On: गुरूवार, नोव्हेंबर 5, 2020 9:57 PM
---Advertisement---

गुरुवारी (५ नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये आयपीएल प्ले ऑफच्या क्वॉलिफायर १चा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी केलेल्या मुंबई इंडियन्स संघाने ५ बाद २०० धावा केल्या. २०१ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. त्यांचे तब्बल ३ फलंदाज केवळ शून्य धावेवर बाद झाले.

सलामीला फलंदाजीला आलेल्या पृथ्वी शॉला ट्रेंट बोल्टने क्विंटन डिकॉकडून झेलबाद केले. त्यानंतर याच षटकातील पाचव्या चेंडूवर अजिंक्य रहाणेला बोल्टने पायचीत केले. त्यानंतर दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने शिखर धवनला त्रिफळाचीत केले.

आयपीएल इतिहासात केवळ तिसऱ्यांदाच झाले असे
आयपीएल इतिहासात ३ फलंदाज शुन्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ होती. यापुर्वी डेक्कन चार्जर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात २०१२मध्ये डेक्कनचे ऍडम गिलख्रिस्ट, हर्षल गिब्ज व व्हीव्हीएस लक्ष्मण हे तीन फलंदाज शुन्य धावेवर बाद झाले होते.

भारताचे ४ सलामीवीर एकाच सामन्यात शुन्य धावेवर बाद
या सामन्यात भारताकडून कोणत्या कोणत्या प्रकारात सलामीला आलेले ४ फलंदाज शुन्य धावेवर बाद झाले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा दिल्ली कॅपिटल्सचे पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे व शिखर धवनने भारताकडून अनेक वेळा सलामीला फलंदाजी केली आहे. हे चारही सलामीवीर आजच्या सामन्यात शुन्य धावेवर बाद झाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-रोहित ‘नो’हिट! आयपीएलमधील अतिशय लाजीरवाणा विक्रम झाला नावावर

-ट्रेलब्लेझर्सच्या घातक गोलंदाजीसमोर मिताली राजच्या संघाने टेकले गुडघे; ९ विकेट्सने झाला पराभव

-Video: विराटने चक्क तलवारीने कापला केक, पाहा बर्थडे सेलिब्रिशन

ट्रेंडिंग लेख-

-आज वाढदिवस असणाऱ्या विराट कोहलीने केले आहेत ‘हे’ खास पराक्रम!

-‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!

-हॅप्पी बर्थडे विराट …!!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---