दिल्ली कॅपिटल्सला ५७ धावांनी पराभूत करत मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२०च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. चार वेळा आयपीएल विजेत्या मुंबईने सहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यावेळी मुंबईला पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याची संधी आहे. या आयपीएलमध्ये संघाने सांघिक खेळाचे दर्शन केले आहे. १५ सामन्यात ७ वेगवेगळ्या खेळाडूंना सामनावीर पुरस्कार मिळाला पुरस्कार मिळाला आहे.
आयपीएल २०२०मध्ये केवळ क्विंटन डि कॉक, सूर्यकुमार व ट्रेंट बोल्टला दोन वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहलाही सामनावीर पुरस्कारासाठी १५व्या सामन्याची वाट पाहावी लागली. कर्णधार रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, ट्रेंट बोल्ट, सूर्यकुमार यादव, क्विंटन डी कॉक, इशान किशन व जसप्रीत बुमराहला सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.
मुंबई इंडियन्स आता विजेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर असून जर त्या सामन्यात मुंबईकडून पुन्हा एकदा चांगला खेळ झाला तर संघाचे पाचवे विजेतेपद नक्कीच पक्के आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-IPL – मुंबई इंडियन्स सहाव्यांदा फायनलमध्ये दाखल; दिल्लीविरुद्ध मिळवला दणदणीत विजय
-मुंबई इंडियन्स सगळ्यांनाच नडली, पण ‘ही’ दोन ठिकाणं कर्णधार रोहितलाच नडली
-मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी रोहित शर्मा सोडणार का सलामीची जागा ?
ट्रेंडिंग लेख-






