आयपीएल २०२०चा हंगाम आता संपला आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने पुढील आयपीएलच्या तयारीसाठी हालचाल सुरू केली आहे. यावर्षी कोरोना व्हायरसमुळे आयपीएल २०२०चे आयोजन उशिरा केले होते. तसं पाहिलं, तर आयपीएलचे आयोजन एप्रिल किंवा मे महिन्यात होते. परंतु यावर्षी आयपीएलचे आयोजन ऑक्टोबर महिन्यात करण्यात आले होते. अशात आयपीएल २०२१ साठी आता केवळ ४ ते ५ महिन्यांचा कालावधी उरला आहे. पुढील हंगामात नवीन संघ सामील होण्याची शक्यता आहे.
९व्या संघाला सामील करण्याची शक्यता
असे म्हटले जात आहे की, बीसीसीआय यावेळी मेगा आयपीएल लिलाव करणार आहे. सोबतच यावेळी आयपीएलमध्ये ९व्या संघाला सामील केले जाऊ शकते. दिवाळी संपल्यानंतर आयपीएल २०२१ साठीचा लिलाव केला जाऊ शकतो.
यापूर्वी असे तर्क लावले जात होते की, बीसीसीआय दोन नव्या संघांना सामील करू शकते. परंतु बीसीसीआय सध्या एकाच संघाला सामील करण्याचा विचार करत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे म्हटले जात आहे.
‘या’ ग्रूपने व्यक्त केली इच्छा
माध्यमांतील काही वृत्तांनुसार, आरपीजी- संजीव गोएंका ग्रूप, टाटा आणि अदानी ग्रूपने नव्या फ्रँचायझीबाबत इच्छा व्यक्त केली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, कोटक महिंद्राचे बँकर रॉनी स्क्रूवाला यांनीही आयपीएल फ्रँचायझी विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
६० ऐवजी होणार ७६ सामन्यांचे आयोजन?
खरं तर संघांनी जी अडचणी मांडली आहे, त्यामध्ये म्हटले आहे की जर एक नवीन संघ आयपीएलमध्ये सामील होत असेल, तर साखळी सामन्यांमध्ये ६० ऐवजी ७६ सामन्यांचे आयोजन केले जाईल. दोन संघ सामील झाले, तर सामन्यांची संख्या ९० होईल.
संघांची मोठी अडचणी अशी आहे की, पुढील आयपीएल हंगामासाठी खूप कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे नवीन बदल करताना सामंजस्य बसवण्यासाठी समस्येचा सामना करावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-विराट, डिविलियर्स संघात असूनही सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत RCB तळाशी ; वाचा अव्वल स्थानी कोण
-‘म्हणलं होतं मामू यांचं गणित कमजोर आहे’, मुंबईच्या विजयानंतर रोहितकडून जुना व्हिडिओ शेअर
-‘ड्वेन ब्रावो तू आता माझ्या मागे राहिलास’, असे का म्हणाला पोलार्ड, घ्या जाणून