आयपीेएल 2019 चा मोसमासाठी आता 1 महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे सर्वच संघानी तयारी सुरु केली आहे. तसेच आयपीएलच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. यावर्षी आयपीएलमध्ये दिल्लीचा संघ दिल्ली कॅपिटल्स या नवीन नावाने खेळणार आहे.
नवीन नावाप्रमाणेच दिल्लीच्या संघाची जर्सीही बदलण्यात आली आहे. या बदलल्या जर्सीचे आज(23 फेब्रुवारी) अनावरण करण्यात आले. ही नवीन जर्सी फिकट निळ्या रंगाची(आकाशी) असून त्यावर पट्टेरी वाघासारखे पट्टे आहेत.
तसेच कॉलरला आणि हाताच्या कडांना लाल रंग आहे. त्याचबरोबर तीन सिंह असलेला दिल्ली संघाचा नवीन लोगो देखील जर्सीच्या वरच्या बाजूला आहे.
दिल्ली संघात असणाऱ्या भारताच्या खेळाडूंनी ही जर्सी परिधान केलेला फोटो दिल्ली कॅपिट्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Yeh rahi #NayiDilliKiNayiJersey ❤️#DelhiIsBlue#ThisIsNewDelhi #DelhiCapitals pic.twitter.com/G5DgdsGowj
— Delhi Capitals (@DelhiCapitals) February 23, 2019
या जर्सीबद्दल संघाच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे की, ‘संघाला नवीन लूक देण्यात आला आहे. ज्याप्रमाणे नवीन लोगोमध्ये तीन वाघ आहेत तसेच फिकट निळ्या रंगाच्या नवीन जर्सीवर वाघासारखे पट्टे आहेत.’
यावर्षी दिल्लीचा पहिला सामना 24 मार्चला मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध होणार आहे. आयपीएलचे पहिल्या दोन आठवड्यातील सामन्यांचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच घोषित झाले आहे. त्याप्रमाणे पहिल्या दोन आठवड्यात दिल्लीचा संघ एकूण 5 सामने खेळणार आहे. त्यातील 3 सामने घरच्या मैदानावर तर 2 सामने बाहेरच्या मैदानावर होणार आहेत.
यावर्षी दिल्लीच्या संघात शिखर धवनचे पुनरागमन झाले आहे. तसेच मागील वर्षी प्रमाणेच यावर्षीही दिल्लीच्या नेतृत्वाची धूरा युवा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरकडे असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–असा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज!
–किंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास!
–पहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया