---Advertisement---

दिल्ली डेअरडेविल्सकडून तीन मोठ्या खेळाडूंना संघातून डच्चू

On: शुक्रवार, नोव्हेंबर 16, 2018 1:33 PM
---Advertisement---

मुंबई | आयपीएल २०१९च्या हंगामासाठी दिल्ली डेअरडेविल्सने आपल्या संघातील १० खेळाडूंना करारातून मुक्त केले आहे. त्यात गौतम गंभीर, मोहम्मद शमी, जेसन राॅय आणि ग्लेन मॅक्सवेलसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

दिल्लीच्या ताफ्यात गेल्या हंगामात २४ खेळाडू होते. त्यातील केवळ १४ खेळाडूंना या संघाने पुढच्या हंगामासाठी संघात कायम केले आहे.

त्यात भारतीय संघातील सध्याचा स्टार खेळाडू पृथ्वी शाॅ, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतचा समावेश आहे.

या हंगामासाठी खेळाडूंना नव्याने संघात घेण्यासाठी दिल्लीकडे आता २५.५० कोटी रुपये शिल्लक आहेत.

दिल्ली डेअरडेविल्सने १२व्या हंगामासाठी कायम केलेले १४ खेळाडू 

श्रेयस अय्यर, रिषभ पंत, पृथ्वी शाॅ, अमित मिश्रा, आवेश खान, हर्शल पटेल, राहुल तेवटिया, जयंत यादव, मनजोत कार्ला, कोलिन मुन्रो, ख्रिस माॅरिस, कागिसो रबाडा, संदीप लामचेन, ट्रेंट बोल्ट.

दिल्ली डेअरडेविल्सने १२व्या हंगामासाठी संघातून मुक्त केलेले १० खेळाडू 
गौतम गंभीर, जेसन राॅय, ज्युनियर डाला, लाईम प्लंकेट, मोहम्मद शमी, शायन घोष, डॅनियल ख्रिस्तीयन, ग्लेन मॅक्सवेल, गुरकित सिंग मान, नमन ओझा.
वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment