इंडियन प्रीमियर लीगच्या सध्याच्या १३ व्या हंगामाच्या २१ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रोमांचक सामना झाला. केकेआरने सीएसकेला १० धावांनी पराभूत करून या हंगामातील त्यांचा तिसरा विजय मिळवला. केकेआरने केलेल्या १६८ धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजयासाठी १० धावा कमी पडल्या. या सामन्यात एका टप्प्यावर त्यांना ४२ चेंडूत ६७ धावांची गरज होती, तर ९ विकेट्स बाकी होती. मात्र, त्यानंतर चेन्नईची मधली फळी पत्त्यांसारखी कोसळत गेली आणि स्पर्धेतील त्यांना चौथा पराभव पत्करावा लागला.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला २१ चेंडूंत ३९ धावांची गरज असताना केदार जाधवने संथगतीने खेळी केली. त्याने १२ चेंडूत ७ धावांची नाबाद खेळी साकारली, यात त्यातील ८ चेंडू त्याने निर्धाव खेळले. जे संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण बनले. आतापर्यंतच्या ६ सामन्यांत जाधवने १९.३३ च्या सरासरीने आणि ९८.३० च्या स्ट्राइक रेटने केवळ ५८ धावा केल्या आहेत.
म्हणूनच, त्याच्या जागी दुसर्या खेळाडूला या हंगामातील उर्वरित सामन्यात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या लेखात केदार जाधव याच्या जागी या संधी मिळू शकणाऱ्या ३ खेळाडूंचा आढावा घेऊ.
३. मुरली विजय
चेन्नई संघासाठी मुरली विजय हा केदार जाधवपेक्षा चांगला पर्याय मानला जाऊ शकतो. स्पर्धेच्या पहिल्या तीन सामन्यात सलामीवीर म्हणून विजयला सीएसकेच्या संघात स्थान देण्यात आले होते, परंतु त्याचे प्रदर्शन प्रभावी झाले नव्हते, त्याने ३ सामन्यात ३२ धावा केल्या होत्या. ज्यामुळे त्याला अंतिम आकारामधून बाहेर बसावे लागले होते. पण आता कर्णधार एमएस धोनी या फलंदाजाला आणखी एक संधी देऊ शकतो; कारण विजयचे आयपीएलमधील एकूण आकडेवारी उत्तम आहे.
सुरुवातीच्या काळात सीएसकेच्या फलंदाजीतील तो महत्त्वाचा खेळाडू होता, त्याने दोन शतके ठोकली होती आणि जवळपास १२० च्या स्ट्राइक-रेटने धावा केल्या होत्या. त्याने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १०६ आयपीएल सामन्यांमध्ये २६१९ धावा केल्या आहेत.
२. ऋतुराज गायकवाड
प्रतिभावान युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडला आयपीएल २०२० मध्ये सतत फ्लॉप कामगिरी करणाऱ्या केदार जाधव याच्या जागी संधी दिली जावू शकते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली आहे.
गायकवाडने ३० टी-२० सामन्यात १३३.८ च्या स्ट्राइक रेटने एकूण ८४८ धावा केल्या आहेत. संघात सलामीला शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसीनंतर त्याला तिसर्या किंवा चौथ्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते.
याशिवाय या युवा खेळाडूवर स्वत: ला सिद्ध करण्यासाठी दबाव असेल. यापूर्वी ऋतुराजला दोन सामन्यांमध्ये संधी मिळाली होती, त्यामध्ये तो एका सामन्यात धावबाद झाला होता. पण नंतर अंबाती रायडू संघात परतल्याने त्याला संघातून बाहेर जावे लागले होते. पण आता त्याला पुन्हा अंतिम ११ मध्ये संधी दिली जावू शकते.
१. नारायण जगदीशन
आयपीएलमध्ये तीन वेळा चॅम्पियन झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघामध्ये नारायण जगदीशन सारखा युवा प्रतिभावान यष्टीरक्षक फलंदाज आहे. २०१८ मध्ये फ्रँचायझीने २० लाख रुपयांच्या बेस प्राइससाठी त्याला खरेदी केले होते. परंतु, संघात एमएस धोनीसारख्या यष्टीरक्षक फलंदाजाच्या उपस्थितीमुळे तो आयपीएलच्या पदार्पणाची वाट पाहत आहे. यावर्षी रणजी ट्रॉफीमध्ये १८३ धावांच्या तुफानी खेळीने नारायण जगदीशनने सर्वांना प्रभावित केले होते. ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या असून त्याने सौराष्ट्र विरुद्ध राजकोट येथे यावर्षी १२ फेब्रुवारी रोजी या धावा केल्या होत्या.
नारायणने प्रथम श्रेणी सामन्यात ४ शतके आणि ४ अर्धशतकांसह ११७४ धावा केल्या आहेत. नारायणने १ शतक आणि ५ अर्धशतकांच्या मदतीने अ श्रेणी क्रिकेटमध्ये ७९० धावा केल्या आहेत. त्यालाही केदारच्या ऐवजी संधी दिली जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘आम्ही संघाचे उत्तम संयोजन केले, म्हणूनच..’ KKR च्या प्रशिक्षकाने सांगितले कुलदीपला वगळण्याचे कारण
फ्रेंच ओपन २०२०: श्वार्टझमनला पराभूत करून नदालचा फायनलमध्ये प्रवेश, जोकोविचशी होणार अंतिम लढत
IPL 2020: राजस्थान विरुद्ध दिल्ली सामन्यानंतरची जाणून घ्या ‘ही’ खास आकडेवारी
ट्रेंडिंग लेख –
शेन वॉर्नने त्याला म्हटले होते भारताचा मोठा स्टार; पण ‘तो’ अचानकच झाला आयपीएलमधून गायब आणि आता…
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला






