या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने आत्तापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. दिल्लीचा संघ सध्या ८ सामन्यांपैकी ६ विजयांसह गुणतालिकेमध्येमध्ये अव्वल स्थानी आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने या हंगामात प्रत्येक विभागात सर्वोत्तम कामगिरी केली आहे आणि म्हणूनच या हंगामात हा संघ टॉप आहे.
दिल्ली कॅपिटल्सने गेल्या हंगामातही चांगली कामगिरी करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी पहिला प्लेऑफ सामना जिंकला पण दुसर्या सामन्यात संघ पराभूत झाला. संघाची जबरदस्त कामगिरी या हंगामातही सुरू आहे. या हंगामात दिल्लीचा संघ आयपीएलचे जेतेपद जिंकणाऱ्या प्रमुख दावेदारांपैकी एक आहे.
दिल्ली कॅपिटल्सने आत्तापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही, परंतु यावेळी ते प्रथमच चॅम्पियन होण्याची शक्यता आहे. जर संघ अशीच उत्तम कामगिरी करत राहिला तर निश्चितपणे यंदा आयपीएल चषक जिंकू शकतो. या लेखात दिल्ली संघाच्या यशाची ३ महत्वाची कारणे कोणती आहेत ती जाणून घेऊ.
या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या यशाची तीन महत्त्वाची कारणे
१. जबरदस्त गोलंदाजी
दिल्ली कॅपिटल्सची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची गोलंदाजी. या संघात कागिसो रबाडा, एन्रीच नॉर्किए, मोहित शर्मा आणि तुषार देशपांडे असे वेगवान गोलंदाज आहेत. तर फिरकी गोलंदाजीत संघामध्ये आर अश्विन आणि अक्षर पटेलच्या रूपात २ जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. आवश्यकतेनुसार मार्कस स्टोईनिसही गोलंदाजी करतो. यंदाच्या आयपीएल हंगामात रबाडा आणि एन्रीच नॉर्किए सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आहेत. एकंदरीत दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी जबरदस्त आहे.
२. पर्यायी खेळाडूंचा साठा
दिल्ली कॅपिटल्स संघाकडे पर्यायी खेळाडू देखील जबरदस्त आहेत. त्यांच्या संघाचे हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत इशांत शर्मा आणि अमित मिश्रासारख्या गोलंदाजांना दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून माघार घ्यावी लागली, परंतु त्याचा दिल्ली कॅपिटल्स संघावर काही परिणाम झाला नाही.
संदीप लामिछनेसारख्या फिरकीपटूंना या हंगामात आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याचवेळी मोहित शर्मा आणि अवेश खान यांना नियमित सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. यावरून दिल्ली संघाकडे जबरदस्त पर्याय आहेत हे दिसून येते.
३. सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू
कोणत्याही संघात जेव्हा जागतिक स्तरावरील अष्टपैलू खेळाडू असतात तेव्हा त्या संघाचे संतुलन खूप चांगले होते. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या बाबतीतही तेच आहे. त्याच्या संघात अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत. या हंगामात मार्कस स्टोइनिसने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याचबरोबर अक्षर पटेल, हर्षल पटेल आणि आर अश्विन हे अष्टपैलू खेळाडूही संघात आहेत. गोलंदाजी बरोबरच फलंदाजीमध्येही महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. हेच कारण आहे की संघाचे संतुलन चांगले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधारांचा दे धक्का! कार्तिकने सोडली कॅप्टन्सी; तर ‘या’ खेळाडूलाही नको आहे नेतृत्त्व?
मोठी बातमी! दिनेश कार्तिक कर्णधारपदावरुन पायउतार; मॉर्गन कोलकाताचा नवा कर्णधार
व्हिडिओ : ‘नाश्त्यात नशीब खाऊन आला आहात’ स्वतःच्याच फलंदाजीवर क्रिकेटपटूने केले समालोचन
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमधील १० विक्रम, ज्यांना मोडणे आहे कठीण
आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा एन्रीच नॉर्किए आहे तरी कोण?
IPL- दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये इशांत शर्माची जागा घेण्यास ३ खेळाडू तयार