आयपीएलचा यंदाचा १३ वा हंगाम यूएईमध्ये खेळला जात आहे. सर्वच संघ उत्तम खेळत आहेत. या हंगामातील सामने निश्वितच चुरशीचे पाहायला मिळाले. २ सामने तर सुपर ओव्हरमध्ये गेले होते. या स्पर्धेत २३ सामने खेळले गेले आहेत. या २३ सामन्यांनंतर आयपीएल २०२० मधील प्ले ऑफमध्ये हे ३ संघ पोहोचणे जवळजवळ निश्चित आहे. या खास लेखात आम्ही त्या ३ संघांबद्दल सांगू.
हे असतील आयपीएल २०२० प्ले ऑफमधील ३ संघ –
दिल्ली कॅपिटल्स
आयपीएल २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल संघही शानदार कामगिरी करत असून आतापर्यंतच्या त्यांच्या ६ सामन्यात फक्त एकच सामना गमावला आहे. या स्पर्धेत ५ सामन्यात विजय मिळवून दिल्ली कॅपिटल्सचा संघ १० गुणांसह क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. या संघाचा फॉर्म पाहता हाही संघ प्लेऑफमध्ये पोहोचणे जवळजवळ निश्चित आहे.
या हंगामात दिल्ली कॅपिटल्समध्ये बरेच चांगले भारतीय खेळाडू आहेत. त्यांच्याकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण चांगले आहे. या संघात मार्कस स्टॉयनिस, शिखर धवनसारखे फलंदाज आहेत, तर रिषभ पंत, पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर असे युवा भारतीय खेळाडू आहेत.
गोलंदाजीतही संघाची कामगिरी जबरदस्त आहे. वेगवान गोलंदाज म्हणून संघाकडे कागिसो रबाडा आणि एन्रीच नॉर्किएसारखे २ जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. त्याचबरोबर फिरकी गोलंदाजीत या संघात अक्षर पटेल, आर अश्विन आणि संदीप लामिछाने असे २ दर्जेदार फिरकीपटू आहेत.
मुंबई इंडियन्स
आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्स संघ उत्कृष्ट खेळ दाखवत असून या संघाने पहिल्या ६ सामन्यांपैकी ४ सामने जिंकून ८ गुणांसह क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्स संघाचा रन रेटही चांगला आहे, त्यामुळे या स्पर्धेत या संघाने आणखी ३ सामने जिंकले, तर प्लेऑफमधील स्थान जवळजवळ निश्चित होईल.
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव, क्विंटन डी कॉक आणि ईशान किशनसारखे भारतीय फलंदाज फॉर्मात आहेत.
तसचे कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या आणि हार्दिक पंड्यासारखे विश्वस्तरीय अष्टपैलू खेळाडू आहेत. या अष्टपैलू खेळाडूंकडे संघासाठी एकहाती सामने जिंकण्याची क्षमता आहे.
गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन आणि नॅथन कुल्टर नाईल यांच्यासारखे अनुभवी गोलंदाज मुंबई संघात आहेत. तसेच फिरकी गोलंदाजीत राहुल चाहरसारखा हुशार युवा फिरकी गोलंदाज आहे.
सनरायझर्स हैदराबाद
या आयपीएलच्या १३ व्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघ जबरदस्त कामगिरी कारण दिसत आहे. या संघातील वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि अष्टपैलू मिशेल मार्श दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर हैदराबाद संघाचे संतुलन बिघडले होते. परंतु नंतर संघाने या स्पर्धेत आपली जागा निर्माण केली. या स्पर्धेत आतापर्यंत ६ सामन्यांमध्ये ३ सामने गमावले असून ३ सामन्यात विजय मिळवला आहे. आता हा संघ क्रमवारीत ६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या संघाकडे कर्णधार डेविड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो सारखे जबरदस्त फॉर्म मध्ये असलेले फलंदाज आहेत. तसेच स्टार फलंदाज मनीष पांडे ही मधली फळी सांभाळत आहे.
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि अष्टपैलू मिशेल मार्श जखमी झाल्यामुळे गोलंदाजीची जबाबदारी फिरकीपटू राशिद खानवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-IPL 2020 : आज पंजाब-कोलकाता आणि चेन्नई-बेंगलोर येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्यांबद्दल सर्वकाही
-IPL 2020: कोलकाताविरुद्धच्या सामन्यात ‘युनिवर्सल बॉस’ ख्रिस गेलचे होणार कमबॅक?
ट्रेंडिंग लेख –
-टी-२० विश्वचषक २०१२ : क्रिकेट जगतातील रावडी संघाला गतवैभव मिळवून देणारी स्पर्धा
-शेन वॉर्नने त्याला म्हटले होते भारताचा मोठा स्टार; पण ‘तो’ अचानकच झाला आयपीएलमधून गायब आणि आता…
-किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला






