इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल २०२०) सुरुवात जोरदार झाली आहे. आतापर्यंतचे सर्वच सामने अटीतटीचे झाले आहेत. गतवर्षी विजयी झालेल्या मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी यंदाही चांगलीच होत आहे आणि आता तो संघ ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
तर दिल्ली कॅपिटल संघाने दुसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर उडी घेतली आहे. दरम्यान, आतापर्यंत या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी कामगिरी केली आहे. पृथ्वी शॉ, शुभमन गिल, राहुल तेवतिया, राहुल त्रिपाठी, मयंक अग्रवाल अशा अनेक भारतीय तरुणांनी सामन्यात रंगत आणली आहे.
दिग्गज खेळाडूंचा विचार केल्यास विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल यांनी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. तथापि, काही दिग्गज खेळाडू आहेत ज्यांची कामगिरी खूपच खराब झाली आहे आणि त्यांच्यामुळे संघातील संतुलन बिघडत चालले आहे.
या लेखात अशाच ४ खेळाडूंबद्दल बोलणार आहोत, ज्यांचे आयपीएल २०२० मधील अंतिम आकारामधील स्थान चुकीचे आहे –
शिवम दुबे – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या मुख्य अष्टपैलू खेळाडूंपैकी एक शिवम दुबेने आयपीएल २०२० ची सुरुवात चांगली केली आणि पहिल्या दोन सामन्यात गोलंदाजीत चांगला हातभार लावला. मात्र, फलंदाजीत ५ सामन्यांत केवळ ९७ धावाच करू शकला असून त्याचा स्ट्राइक रेट केवळ १२९.३३ आहे. आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये आरसीबीला जोरदार पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि या सामन्यांमध्ये दुबेने संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर नेण्याची अपेक्षा होती. तथापि, यामध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला.
दुबेऐवजी आरसीबी संघात पवन नेगीला खेळवणे फायद्याचे ठरु शकते. डावखुरा फिरकीपटू म्हणून नेगी उपयुक्त ठरेलच, परंतु फलंदाज म्हणूनही तो संघासाठी चांगली कामगिरी करू शकतो. तसेच तो एक उत्तम क्षेत्ररक्षक देखील आहे. पवन नेगी आरसीबी संघाला नक्कीच चांगले योगदान देऊ शकतो.
शिमरन हेटमीयर – दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्सने ६ पैकी ५ सामने जिंकले आहेत आणि १० गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तथापि, संघाचा आतापर्यंत सर्वात पाहिला कमकुवत दुवा म्हणजे शिमरन हेटमीयर. शिमरन हेटमीयर आपल्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखले जातो, परंतु या मोसमात त्यांची बॅट पूर्णपणे शांत झाली आहे.
शिमरन हेटमीयरने आतापर्यंत ६ सामने खेळले असून १४९.१८ च्या स्ट्राइक रेटने केवळ ९१ धावा केल्या. दरम्यान, त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीचीही संधी मिळाली आणि आता संघ त्याला फिनिशर म्हणून वापरत आहे. तथापि, युएईच्या विकेटवर तो खूप संघर्ष करीत आहे.
त्याच्या जागी टीम केमो पॉल किंवा अॅलेक्स कॅरी हे संघात जागा घेऊ शकतात. केमो पॉलच्या रूपात संघाला अतिरिक्त गोलंदाजाचा पर्याय मिळू शकतो तर अॅलेक्स कॅरी हा एक चांगला फिनिशर आहे. शिवाय ते कठीण परिस्थितीत संघ सांभाळू शकतात. शिमरन हेटमीयरची क्षेत्ररक्षणही बऱ्यापैकी झाला आहे. जर दिल्ली कॅपिटल्स चांगली कामगिरी करत राहिली तर त्यांना हेटमीयरची जागा चांगली फिनिशरसह घ्यावी लागेल.
ग्लेन मॅक्सवेल – किंग्ज इलेव्हन पंजाब
यावर्षी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ग्लेन मॅक्सवेलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. परंतु, आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या या अनुभवी खेळाडूने पूर्णपणे निराश केले आहे आणि किंग्ज इलेव्हन पंजाबच्या खराब कामगिरीचे हे एक कारण आहे.
ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने अवघ्या ४८ धावा केल्या आहेत. पंजाब संघाची मधली फळी पूर्ण फ्लॉप ठरली आहे आणि जेव्हा प्रत्येक वेळी मॅक्सवेलकडून मोठी अपेक्षा केली गेली तेव्हा त्याने संघाला निराश केले आहे.
केदार जाधव – चेन्नई सुपर किंग्ज
आयपीएल २०२० मध्ये खेळाडूंच्या कामगिरीत सर्वाधिक निराश करणारा संघ चेन्नई सुपर किंग्ज आहे. तथापि, संघाच्या खराब कामगिरीचे कारण संघातील अनुभवी खेळाडू आहे. यात केदार जाधव हे नाव प्रामुख्याने घेतले जाईल. केदार जाधवने आतापर्यंत झालेल्या स्पर्धेत ६ सामन्यांत केवळ ५८ धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट १०० च्या खाली आहे.
लक्षात घेण्याची बाब म्हणजे जाधव मागील वर्षी भारतीय संघाच्या विश्वचषक संघात होता आणि तो फॉर्ममध्ये नसल्याचे दिसत आहे. त्याची खराब फलंदाजी चेन्नईच्या पराभवाचे कारण ठरु शकते. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्याच्या शेवटी त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली ते आश्चर्यकारक होते. जाधवच्या जागी सीएसके युवा खेळाडूंना संधी देऊ शकते.