---Advertisement---

काय आहे भानगड? अर्धशतक झळकावले ऋतुराज गायकवाडने पण ट्रोल झाला धोनी

On: सोमवार, ऑक्टोबर 26, 2020 7:52 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० मध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने रविवारी (२५ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभूत केले. चेन्नईच्या या विजयात ऋतुराज गायकवाडची खेळी लक्षवेधी ठरली. त्याने आपल्या अर्धशतकाच्या मदतीने संघाला विजय मिळवून दिला. परंतु या विजयानंतर चाहत्यांनी #Spark हा हॅशटॅग वापरत कर्णधार एमएस धोनीला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

धोनीने म्हटले होते की, खेळाडूंमध्ये स्पार्क दिसत नाही

सोमवारी (१९ ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्सविरुद्ध ७ विकेट्सने पराभूत झाल्यानंतर धोनीला विचारण्यात आले होते की, पुढील सामन्यांमध्ये समान संघ राहील की रणनितीमध्ये बदल होईल? यावर प्रत्युत्तर देताना तो म्हणाला, “तुम्हाला संघात वारंवार बदल करायचा नसतो. तुम्हाला ड्रेसिंग रूममध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ नये असे वाटते. सोबतच युवा खेळाडूंमध्ये आम्हाला ती चमक दिसली नाही.”

“परंतु या निकालांमुळे इतर सामन्यांमध्ये युवा खेळाडूंना संधी दिली जाईल. कदाचित पुढील सामन्यांमध्ये आम्ही त्यांना संधी देऊ आणि ते दबावाशिवाय खेळू शकतील,” असेही तो पुढे म्हणाला.

प्लेऑफमधून चेन्नई सुपर किंग्स बाहेर

तरीही रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नईला विजय मिळाला. बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने महत्त्वाची भूमिका साकारली. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर म्हटले की, धोनीला ज्या खेळाडूंमध्ये प्रतिभा दिसत नव्हती. त्याच खेळाडूंनी संघाला विजय मिळवून दिला.

https://twitter.com/S_u_R_y_a_4/status/1320371292659351554

या विजयानंतर संघावर कोणताही फरक पडला नाही. आयपीएल२०२० मध्ये प्लेऑफमधून बाहेर होणारा चेन्नई पहिला संघ ठरला.

चेन्नईचा पुढील सामना गुरुवारी (२९ ऑक्टोबर) दुबई येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘धोनी बरोबर होता, चेन्नईच्या युवा खेळाडूंमध्ये…’, मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर उडाली टीकेची झोड

-स्पर्धेतून बाहेर गेलेली चेन्नई ठरणार ‘या’ संघांसाठी डोकेदुखी; बिघडवणार प्लेऑफची गणितं?

-“आठ किंवा दहा विकेट्सने झालेल्या पराभवाचा फरक पडत नाही पण…”, मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर धोनीची प्रतिक्रिया

ट्रेंडिंग लेख-

-IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ

-कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी

-अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---