दुबई। आयपीएल २०२० साठी यूएईत गेलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या २ खेळाडूंसह १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर आता परदेशी खेळाडूंनाही कोरोनाची भीती वाटायला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉश हेजलवुडने म्हटले की, तो आयपीएल २०२०मध्ये सीएसके संघातील कोरोनाची प्रकरणं पाहून चिंतेत पडला आहे. परंतु त्याचे लक्ष सध्या इंग्लंड दौऱ्यात खेळण्यात येणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेवर आहे.
हेजलवूड (Josh Hazelwood) म्हणाला की, “आमचा एक व्हॉट्सऍप ग्रूप आहे. त्यातूनच आम्हाला माहिती मिळते. हा स्पष्टपणे चिंतेचा विषय आहे.”
जो कोणी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळला आहे, त्याला वेगळ्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. बीसीसीआयच्या मानक प्रणालीनुसार, जो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळतो, त्याला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे. क्वारंटाईननंतर चाचणीत २ वेळा निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना जैव- सुरक्षित वातावरणात प्रवेश मिळण्याची परवानगी असणार आहे.
हेजलवूड पुढे म्हणाला, “तुमच्याकडे अशाप्रकारे कोणीही कोरोना पॉझिटिव्ह आढळले नाही पाहिजे. ते सध्या क्वारंटाईनमध्ये आहेत. मला वाटते की, पुढील काही दिवसांमध्ये ते संपेल. माझे संपूर्ण लक्ष सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. आणि जेव्हा आयपीएल जवळ येईल, तेव्हा आम्ही त्याबद्दल विचार करू.”
हेजलवूड इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा भाग आहे. दोन्ही संघ ४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबरपर्यंत साऊथँम्पटन येथे ३ सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका आणि मॅनचेस्टर येथे ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहेत.
२९ वर्षीय हेजलवूड व्यतिरिक्त डेव्हिड वॉर्नर (David Warner), स्टिव्ह स्मिथ (Steve Smith), पॅट कमिन्स (Pat Cummins), ऍरॉन फिंच (Aaron Finch) तसेच आणखी काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएलमध्ये भाग घेण्यासाठी दुबईला रवाना व्हायचे आहे. तो म्हणाला की, आयपीएलमध्ये जर कोविड-१९ ची प्रकरणे वाढली, तर क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत याबाबतीत चर्चा होईल.
कोरोना व्हायरसबद्दल (Corona Virus) बोलताना तो म्हणाला, “आम्ही याबाबत आता चर्चा केलेली नाही. तिथे जाण्यासाठी अजूनही काही आठवडे बाकी आहेत. जर आम्ही पोहोचण्याचा तारखेपर्यंत कोरोनाची प्रकरणे वाढली, तर आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी चर्चा करू.”
आयपीएलची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार असून अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-सीएसकेला सोडून रैना परतला भारतात, परंतू धोनी मात्र आला चाहत्यांच्या निशाण्यावर
-…आणि तेव्हा ७७ वर्षांचे प्रणव दा क्रिकेट खेळण्यात रमले
-माझी कसोटी कारकीर्द बळकट करायची आहे, आयपीएलमध्ये संधी मिळाल्यास ती बोनस ठरेल, पहा कोण म्हणतंय
ट्रेंडिंग लेख-
-तुटपूंज्या किंमत मिळूनही ‘हे’ ५ खेळाडू ठरले आयपीएलमध्ये सुपर डुपर हिट
-भारत सोडून या ५ देशाचे सर्वाधिक खेळाडू झाले आहेत आयपीएलमध्ये मालामाल
-आयपीएलमध्ये सर्वच संघांकडून पहिली विकेट घेणारे ८ गोलंदाज