१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या १३ व्या हंगामाला युएईमध्ये सुरुवात होणार आहे. परंतु या हंगामाला सुरुवात होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्स संघाला जोरदार धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख खेळाडू युएईमध्ये सुरेश रैना भारतात परतला असून तो या हंगामात वैयक्तिक कारणामुळे खेळणार नाही, असे सांगण्यात आले आहे. परंतु त्याने या हंगामातून माघार घेण्यामागे नक्की कोणते कारण आहे, याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.
पण त्यादरम्यान माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रैनाच्या आयपीएलमधून माघार घेण्यावर चेन्नई सुपर किंग्सचे संघमालक एन श्रीनिवासन यांनी आश्चर्यचकीत करणारे विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की हॉटेलमध्ये रैनाला बाल्कनी असलेली रुम न मिळाल्याने तो नाराज झाला होता.
पण या सर्व घटनांदरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीही सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. मागे १५ ऑगस्टला जेव्हा धोनीने आंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तेव्हा त्याच्यापाठोपाठ तासाभरातच रैनाही निवृत्त झाला होता. ही गोष्ट लक्षात घेत चाहत्यांनी धोनीला ट्रोल करणे सुरु केले आहे की त्याने आत्ता रैनाची साथ दिली नाही.
याबरोबरच श्रीनिवासन यांच्यानुसार रैनाने पाहिजे ती रुम न मिळाल्याने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे रैना देखील ट्रोल होत आहे.
So as per Srini, Raina wanted room like Dhoni and he left as he didn't get it…..
Le Raina….#raina pic.twitter.com/3HhJHK7WiF
— Baba (@bhaveshkjha) August 31, 2020
So Raina the CSK hanuman has been thrown out of team on some frivolous grounds and Dhoni didn't do anything.
Le Raina…
#raina pic.twitter.com/TcgIvqJehh
— Baba (@bhaveshkjha) August 31, 2020
https://twitter.com/AnkitD86135043/status/1300384161937657861
https://twitter.com/JaiswalTanmay/status/1300292030090805248
https://twitter.com/mrsohail_/status/1300331318975234049
After seeing reason that Raina came back because Dhoni refused to give his hotel room with balcony to Raina. #Raina #CSK #Dhoni
Everyone be like: pic.twitter.com/8UGsVDCCgZ— Manpreet Saluja (@preet_1506) August 30, 2020
सुरेश रैना २००८ पासून प्रत्येक आयपीएल हंगामात आत्तापर्यंत खेळला आहे. त्यामुळे हा पहिलाच असा हंगाम असेल ज्यात तो खेळणार नाही. रैना हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचाही खेळाडू आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १९३ सामन्यात खेळताना ३३.३४ च्या सरासरीने ५३६८ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
…आणि तेव्हा ७७ वर्षांचे प्रणव दा क्रिकेट खेळण्यात रमले
१९८० सालीच प्रणवदां मिळाली होती बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची ऑफर
माझी कसोटी कारकीर्द बळकट करायची आहे, आयपीएलमध्ये संधी मिळाल्यास ती बोनस ठरेल, पहा कोण म्हणतंय
ट्रेंडिंग लेख –
भारत सोडून या ५ देशाचे सर्वाधिक खेळाडू झाले आहेत आयपीएलमध्ये मालामाल
आयपीएलमध्ये सर्वच संघांकडून पहिली विकेट घेणारे ८ गोलंदाज
आयपीएलमध्ये कर्णधार तर अनेक झाले, पण यश मात्र या ५ जणांनाच मिळाले






