---Advertisement---

“फलंदाजाने १०० मीटरपेक्षा अधिक लांब षटकार ठोकल्यास त्याला अतिरिक्त धावा…”

On: गुरूवार, ऑक्टोबर 15, 2020 3:33 PM
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली या हंगामातील खेळलेल्या सुरुवातीच्या तीन सामन्यात काही खास कामगिरी करू शकला नव्हता. या तीन सामन्यात त्याने फक्त 18 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर खेळलेल्या सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली. या हंगामात त्याने खेळलेल्या एकूण 7 सामन्यात 256 धावा केल्या आहेत. मात्र या खेळात काही बदल व्हावेत अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे. किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलशी इंस्टाग्राम लाईव्ह चॅटवर केलेल्या संभाषणात त्याने ही गोष्ट बोलून दाखवली. केएल राहुलनेही त्याचे समर्थन करत पुन्हा एक बदल व्हावा असे सांगितले.

राहुलशी झालेल्या संभाषणात कोहली म्हणाला, “कर्णधार म्हणून तुमच्याकडे कंबरेच्या वरचा चेंडू किंवा वाइड चेंडू पुन्हा तपासण्यासाठी डिसिजन रिव्ह्यूव सिस्टिमचा (डीआरएस) पर्याय असायला हवा. कधीकधी पंचानी दिलेले निर्णय चुकीचे असू शकतात. आपण पाहिले आहे की या गोष्टी आयपीएल आणि इतर मोठ्या टी20 स्पर्धांमध्येही महत्त्वाच्या असतात.”

कोहलीच्या वक्तव्याचे समर्थन करताना राहुल म्हणाला, “असा नियम आला तर आनंद होईल. तुम्ही एखाद्या संघाला दोन डीआरएस दिले आणि असे सांगितले की आपण ते पंचाच्या कोणत्याही निर्णयाविरूद्ध वापरू शकता तर ही चांगली बाब आहे.”

पंजाबचा कर्णधार राहुल पुढे म्हणाला की, “जर फलंदाजाने मारलेल्या षटकाराची लांबी 100 मीटरपेक्षा जास्त असेल तर त्याला अतिरिक्त धावा देण्यात याव्या.”

महत्त्वाच्या बातम्या –

दिल्लीला दुखापतींनी घेरले; रिषभ पंत पाठोपाठ आता खुद्द कर्णधारावरच आले संकट

Video: आयपीएलमध्ये ‘बिहू’ डान्सची क्रेझ; शॉला शुन्यावर बोल्ड केल्यावर आर्चरचे थिरकले पाय

दया कुछ तो गडबड है! गुगलने शोधला सचिन तेंडुलकरचा ‘जावई’

ट्रेंडिंग लेख –

मराठी मनाचा अभिमान.! नाव ‘तांबे’ पण खेळाडू मात्र सोन्यासारखा

गुळाचे व्यापारी असणाऱ्या कोल्हापूरच्या पाटलाचा मुलगा भारताकडून खेळला अवघा एकच सामना, पण…

IPL : पंजाबकडून शतक करणारे ३ खेळाडू, जे आज कोणाच्या लक्षातही नाहीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---