दुबई | ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर शेन वॉटसनने 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलपूर्वी नेटमध्ये सराव सुरु केला आहे. तो पहिल्या सराव सत्रानंतर म्हणाला की गमावलेली लय पुन्हा मिळवण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही.
एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह प्रकरणांनंतर तिसर्या फेरीच्या तपासणीनंतर पुन्हा सराव सुरू केला आहे.
वॉटसनने ट्विट केले की, “पहिल्या सराव सत्रात चेन्नई सुपर किंग्जच्या सहकारी खेळाडूंसह संघात पुनरागमन करणे फारच रोमांचक होते, खूप मजेदार होते. लय मिळविण्यात आता जास्त वेळ लागणार नाही.”
It was another very fun night training with all of my @ChennaiIPL mates. 😁😁🦁🦁👌🏻👌🏻 @IPL #WhistlePodu pic.twitter.com/r9aFd6olGS
— Shane Watson (@ShaneRWatson33) September 6, 2020
2018 आयपीएलपूर्वी वॉटसनला चेन्नईने विकत घेतले होते. गेल्या दोन वर्षात 953 धावा करण्याबरोबरच त्याने सहा बळीही घेतले आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज 25 ऑगस्टपासून सराव करणार होता, परंतु त्याआधी सीएसकेचे दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासह 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले. यानंतर या संघासह 6 दिवस इतर खेळाडूंनाही क्वारंटाईन ठेवण्यात आले. इतर खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सराव करण्याची परवानगी दिली. तर दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड आपला क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर संघात सामील होतील.
लीग सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला यापूर्वीच दोन मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. संघातील दोन मोठे खेळाडू सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी यावेळी आयपीएलमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. सुरेश रैना लीगमधील दुसर्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे तर हरभजन सिंगने गेल्या वर्षी सीएसकेसाठी शानदार गोलंदाजी केली होती. धोनी या दोघांची उणीव कशी पूर्ण करेल हे पाहणे फारच रंजक ठरणार आहे.