मुंबई । आयपीएल 2020 ला धुमधडाक्यात सुरवात झाली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात चेन्नईने 5 विकेट्सने विजय मिळविला. अंबाती रायुडूने चेन्नईकडून 71 धावांची शानदार खेळी साकारली, ज्यासाठी त्याला सामनावीराचा किताब मिळाला. या सामन्यानंतर संजय मांजरेकर पुन्हा एकदा असे काही बोलले की, त्याबद्दल क्रिकेट चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
चेन्नईच्या या विजयावर माजी भारतीय क्रिकेटपटू व समालोचक संजय मांजरेकर यांनी वादग्रस्त भाष्य करत सामना विजेते खेळाडू अंबाती रायडू आणि पीयुष चावला यांना ‘लो प्रोफाइल’ क्रिकेट म्हणून संबोधले. मांजरेकर यांनी सीएसकेचे अभिनंदन केले आणि लिहिले की, “लो प्रोफाइल क्रिकेटपटू पियुष चावला आणि अंबाती रायुडू यांच्या कामगिरीमुळे मी फार खूष आहे. चावलाने चेंडूने चमकदार कामगिरी करत 5 व्या आणि 16 व्या षटकांत गोलंदाजी करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्याचवेळी रायडूने आतापर्यंतचा आयपीएलचा सर्वोत्कृष्ट डाव खेळला. शाब्बास सीएसके.!”
So happy for two pretty low profile cricketers Piyush Chawla and Ambati Rayudu. Chawla was sensational with the ball. Bowled the 5th & 16th over too. Rayudu..well…one of the best IPL innings from him based on quality of shots played! Well done CSK!👏👏👏 #IPL2020
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) September 19, 2020
यानंतर चाहत्यांनी मांजरेकरांना योग्य शब्दांचा वापर करण्याचा सल्ला दिला.
Dear sanjay, you should have used “ underrated” rather “low profile”. Going forward please use right words!!🙏
— Tarzan (@Rockingrebel_KK) September 19, 2020
परस्पर विरोधी विधानांमुळे मांजरेकर कॉमेंट्री पॅनलच्या बाहेर
संजय मांजरेकर हे त्यांच्या वादग्रस्त विधाने आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत राहिले आहेत. यापूर्वी त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली होती, यामुळे ते सध्या बीसीसीआयच्या कॉमेंट्री पॅनेलचा भाग नाहीत.
मांजरेकर यांनी रविंद्र जडेजाला 2019च्या विश्वचषका दरम्यान ‘बिट्स आणि पीस प्लेयर’ म्हटले होते. यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या ऐतिहासिक दिवस- रात्र कसोटी सामन्या दरम्यान सहकारी आणि प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी क्रिकेट न खेळण्याबद्दल टीका केली होती. त्यानंतरच बीसीसीआयने मांजरेकरांवर कारवाई केली आणि कमेंट्री पॅनेलमधून बाहेरचा रस्ता दाखवला.
Sanjay sir himself was a low profile, was never able to perform also forget to mention a jelous player..
everyone know with whom he was jelous— Lovelish Agarwal (@lovelish1983) September 20, 2020
सध्या बीसीसीआयने सुनील गावस्कर, एल. शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, दीप दासगुप्ता, रोहन गावस्कर, हर्षा भोगले आणि अंजुम चोप्रा यांना आयपीएलच्या कॉमेंट्री पॅनेलमध्ये समाविष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा सामना कुठे आणि कसे पाहणार? वाचा सविस्तर माहिती
-एकतर षटकार मारेन किंवा बाद होईल ही मानसिकता घेऊनच खेळलो; पहा कोण म्हणतंय
-‘या’ संघाच्या कर्णधाराला हवंय खास गिफ्ट, जे बनवेल त्याचा आयपीएल हंगाम खास
ट्रेंडिंग लेख-
-२२ व्या वर्षी दिग्गजांच्या पंक्तीत सामील झालेला राशिद खान
-कहर धोनीचा! पहिल्याच आयपीएल सामन्यात नावावर केले एक-दोन नव्हे तर ३ किर्तीमान
-श्रेयस अय्यर आणि केएल राहुल ‘या’ ११ खेळाडूंसह आज उतरतील मैदानावर, पहा कुणाला मिळेल जागा