---Advertisement---

मार्केट पडल्यावर ऋतुराज गायकवाडचा ट्रकभर कांदा मार्केटमध्ये, सीएसकेच्या विजयानंतर मीम्सचा पाऊस

---Advertisement---

अबु धाबी येथे रविवारी (१ नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबला ९ विकेट्सने पराभूत केले. साखळी सामन्यातील चेन्नईचा हा शेवटचा सामना होता. चेन्नईच्या विजयात धडाकेबाज युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने मोलाचे योगदान दिले. मात्र चेन्नईसाठी प्लेऑफची दारं बंद झाल्यानंतर ऋतुराजने चांगली खेळी करायला सुरुवात केली. त्यामुळे आता चेन्नईच्या विजयानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे.

नाणेफेक जिंकून चेन्नई संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १५३ धावा केल्या होत्या. हे आव्हान चेन्नईने अवघ्या १८.१ षटकात १ विकेट्स गमावत पूर्ण केले.

चेन्नईकडून सलामीला फलंदाजी करताना ऋतुराजने सर्वाधिक नाबाद ६० धावांची अर्धशतकी खेळी केली. या धावा करताना त्याने १ षटकार आणि ६ चौकार ठोकले. सोबतच डू प्लेसिस (४८) आणि रायडूने (३०) धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

चेन्नईच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर लुंगी एंगिडीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकात ३९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्यासोबतच शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा आणि इम्रान ताहीरने प्रत्येकी १ विकेट घेतली.

चेन्नईच्या विजयानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/eswapnilrd/status/1322916655249281024

https://twitter.com/1sInto2s/status/1322896389697794050

https://twitter.com/Indianslumdog/status/1322916879787122690

https://twitter.com/iam_sanj/status/1322915690983030785

https://twitter.com/unApologeticmem/status/1322917924386922496

https://twitter.com/SandipBaishnab/status/1322914096472182785

 

 

चेन्नई संघाने आयपीएलच्या या हंगामात एकूण १४ सामने खेळले. त्यात त्यांनी ६ सामन्यात विजय, तर उर्वरित ८ सामन्यात पराभवाचा सामना केला. यावर्षी चेन्नईला आयपीएलचे चौथे विजेतेपद जिंकता आले नाही. मात्र, पुढच्या वर्षी चेन्नई पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करेल.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---