---Advertisement---

IPL 2020: चेन्नई विरुद्ध बेंगलोर सामन्यात धोनी, कोहलीसह ‘हे’ खेळाडू करु शकतात खास विक्रम

On: शनिवार, ऑक्टोबर 10, 2020 5:59 PM
---Advertisement---

आयपीएलच्या १३ व्या हंगामातील २५ वा सामना शनिवारी(१० ऑक्टोबर) दुबई येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेजर्स बेंगलोर संघात होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळानुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल. या हंगामात आतापर्यंत चेन्नईने ६ पैकी २ सामने जिंकले आहेत आणि ४ सामने गमावले आहेत. दुसरीकडे बेंगलोरने ५ सामन्यांपैकी ३ सामना जिंकले आहेत आणि २ सामने गमावले आहेत.

शनिवारी होणाऱ्या या सामन्यादरम्यान चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आणि बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीसह काही खेळाडूंना विक्रम करण्याची संधी आहे. त्याच विक्रमांचा आढावा आपण घेऊया.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांमध्ये रंगणाऱ्या सामन्यात होऊ शकतात हे विक्रम –

– एमएस धोनीने जर या सामन्यात २ झेल घेतले तर तो आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून १०० झेल पूर्ण करेल.

– फाफ डु प्लेसिसने जर १ झेल घेतला तर तो आयपीएलमध्ये ५० झेल पूर्ण करेल.

– विराट कोहलीने जर ७ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले तर तो आयपीएलमध्ये २०० षटकार पूर्ण करेल. तसेच २०० आयपीएल षटकार मारणारा तो एकूण ५ वा फलंदाज ठरले. त्याच्याआधी ख्रिस गेल, एबी डिविलियर्स, एमएस धोनी आणि रोहित शर्माने हा कारनामा केला आहे.

– एबी डिविलियर्सला आयपीएलमध्ये १०० झेलांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी ४ झेलांची आवश्यकता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---