इंडियन प्रीमियर लीगमध्ये मंगळवारी (29सप्टेंबर) सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी) यांच्यात सामना होणार आहे. दिल्ली संघाने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत, तर हैदराबादने अद्याप एकही गुण नोंदविले नाहीत. दिल्लीचा संघ खूप संतुलित दिसत आहे. भारतीय खेळाडूंनी परिपूर्ण असलेल्या या संघाने आतापर्यंत स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली आहे. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबादच्या संघाच्या अनेक समस्या समोर आल्या आहेत. संघाची मधली फळी कमकुमवत वाटत आहे आणि वरच्या फळीवर जास्त अवलंबून असणे त्याच्यासाठी धोकादायक ठरत आहे.
सनरायझर्सचा मध्यक्रम आहे कमकुवत
सनरायझर्स हैदराबादच्या (एसआरएच) मधल्या फळीकडे अनुभवाचा अभाव आहे. आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये ही कमतरता स्पष्टपणे दिसून येत आहे. या हंगामात संघाने अद्याप गुणांचे खाते उघडलेले नाही परंतू संघाच्या अडचणी मात्र नव्याने दिसत आहेत.
दिल्लीची गोलंदाजी आहे मजबूत
दिल्ली संघाकडे संतुलित गोलंदाजी आक्रमण आहे. संघाचे दोन गोलंदाज इशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्विन संघात नाहीत. असे असूनही संघात कागिसो रबाडा, अमित मिश्रा, आंद्रे नॉर्त्जे, अक्षर पटेल व अवेश खानसारखे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहेत.
दिल्लीची फलंदाजीही आहे मजबूत
दिल्लीची फलंदाजीही बरीच मजबूत आहे. शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि रीषभ पंत या प्रत्येकांनी धावा केल्या आहेत. स्पर्धेपूर्वी दिल्लीच्या संघातील सर्वात मोठी कमजोरी फिनिशरची अनुपस्थिती मानली जात होती, पण आता मार्कस स्टॉयनिसचा खेळ पाहता असे म्हणता येईल की दिल्लीनेही यावर मात केली आहे.
सनरायझर्ससमोर अनेक प्रश्न
त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबादची सर्वात मोठी समस्या म्हणजे प्लेईग इलेव्हन निवडणे होय. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो यांच्या जोडीनंतर अनुभवी मनीष पांडे तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला येत आहेत, पण त्यानंतर संघाच्या फलंदाजांच्या क्रमवारीत थोडा कमकुवतपणा जाणवतो. कंबरेच्या दुखण्यामुळे विजय शंकर शेवटच्या सामन्यात खेळू शकला नाही. त्यांच्या जागी ऋद्धिमान साहाला संधी देण्यात आली. मात्र कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 31 चेंडूंत 30 धावा फटकावल्या, ज्या टी२० प्रकारात नक्कीच कुठेच बसत नाहीत.
संभावित एकादश
दिल्ली कॅपिटल्स (DC)- पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), रीषभ पंत (यष्टिरक्षक), शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, अमित मिश्रा, कागिसो रबाडा, आंद्रे नॉर्त्जे, आवेश खान
सनराइजर्स हैदराबाद (SRH)- डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (यष्टिरक्षक), मनीष पांडे, विजय शंकर, मोहम्मद नबी, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद