मुंबई । इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) फ्रंचायझी दिल्ली कॅपिटलने इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस वोक्सच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या एनरिच नॉर्टजेचा संघात समावेश केला आहे. 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल २०२० कोरोना व्हायरसमुळे आधी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती तर त्यानंतर आयपीएलचा 13 वा हंगाम यूएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. सर्व खेळाडू आणि संघांनी या स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या ख्रिस वोक्सने आयपीएलमधून नाव माघारी का घेतले? याचे कारण सांगितले नाही. वोक्सची जागी एनरिच नॉर्टज हा खेळाडू खेळणार आहे. त्याचा हा आयपीएलचा पहिला हंगाम असेल. 26 वर्षांचा नॉर्टजे गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार होता, पण खांद्याच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला होता.
दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील होताना, एनरिच नॉर्टजे म्हणाला, “दिल्ली संघात सामील होण्यास मी खूप उत्साही आहे. ही स्पर्धा खेळण्याची संधी मिळल्याने मला मोठा अनुभव मिळेल यात शंका नाही.”
या वेगवान गोलंदाजाने मागील वर्षी भारताविरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमधे पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी 6 कसोटी सामन्यांत 35.11 च्या सरासरीने 19 विकेट्स घेतल्या आहेत. 7 वनडे सामन्यात 20.21 च्या सरासरीने 14 तर 3 टी 20 सामन्यात 48.5 च्या सरासरीने 2 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याला 2020 साठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या ‘न्यूकमर ऑफ दी इयर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्यासोबत दिल्ली संघात कागिसो रबाडाही असेल. दिल्ली कॅपिटलसचा प्रशिक्षक ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आहे. यासह या संघाच्या कर्णधारपदाची धुरा भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरच्या हातात आहे.
And we can't wait to watch you steam in and let it rip 🔥
Welcome to the Capitals, @AnrichNortje02 🙌🏻#WelcomeAnrich#IPL2020 #YehHaiNayiDilli pic.twitter.com/ZyoPm0Cw5v
— Delhi Capitals (@DelhiCapitals) August 18, 2020
गेल्या वर्षी आयपीएलच्या लिलावात ख्रिस वोक्सला दिल्ली कॅपिटल्सने 1.5 कोटीत खरेदी केली होती. या वर्षाच्या सुरूवातीस ख्रिस वोक्सने आंतरराष्ट्रीय सामन्यात स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आयपीएलमधून माघार घेतली आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडूंची यादीः
श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्सर पटेल, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, चेमो पॉल, पृथ्वी शॉ, रविचंद्रन अश्विन, रिषभ पंत, संदीप लामिछाने, शिखर धवन, जेसन रॉय, एनरिच नॉर्टजे, अॅलेक्स कॅरी, शिमरॉन हेटमीयर, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, मार्कस स्टोनिस आणि ललित यादव.