आयपीएल २०२० चा अंतिम सामना आज (१० नोव्हेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संपन्न होणार आहे. मुंबई इंडियन्स आपले विजेतेपद राखण्यासाठी, तर दिल्ली कॅपिटल्स आपले पहिले विजेतेपद मिळण्यासाठी मैदानात उतरेल. मात्र, या निर्णायक सामन्याआधी मैदानाबाहेरील वाकयुद्धाला सुरुवात झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंगने मुंबई इंडियन्सला अंतिम सामन्याविषयी चेतावणी दिली आहे.
आपल्या संपूर्ण कारकीर्दीत आपल्या शब्दांनी विरोधी संघाला नामोहरम करण्यात पटाईत असलेल्या पॉंटिंगने मुंबई इंडियन्सला आव्हान देताना म्हटले की, “मुंबईने अंतिम सामन्यात आम्हाला हलक्यात घेऊ नये. कारण, अजून आमचा सर्वोत्तम खेळ होणे बाकी आहे. तुम्ही सहाव्यांदा अंतिम सामना खेळत असला, तरी आम्ही कसलाही दबाव न घेता आमच्या पहिल्या अंतिम सामन्यात उतरणार आहोत.”
या हंगामात यापूर्वी दोन्ही संघ तीन वेळा आमनेसामने आले आहेत. या तीनही सामन्यात दिल्लीला मुंबईच्या हातून पराभव स्वीकारावे लागले आहेत. त्याबाबत सांगताना रिकी पॉंटिंगने म्हटले की,
“आम्ही हंगामाची सुरुवात चांगल्या लयीत केली होती. मात्र, स्पर्धेच्या मध्यात आम्ही ती लय गमावली. अखेरच्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात आमची कामगिरी उत्तम राहिली आहे. अंतिम सामन्यात आम्ही खेळाचा एक वेगळाच स्तर नक्कीच गाठू. क्रिकेटच्या मैदानावर हार-जीत होत असते; सर्व संघांनी विजय-पराजय असा प्रवास केलाच आहे. संघातील सर्व खेळाडूंनी स्वतःवर विश्वास ठेवत, आज हा अंतिम फेरीचा पल्ला गाठला आहे. आम्ही दिल्लीच्या पाठीराख्यांना नक्कीच नाराज करणार नाही.”
ऑस्ट्रेलियाला कर्णधार म्हणून दोन वनडे क्रिकेट विश्वचषक आणि दोन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रिकी पॉंटिंगसाठीसाठी आजचा अंतिम सामना प्रशिक्षक म्हणून महत्त्वपूर्ण असेल. कारण, यापूर्वी तो प्रशिक्षक या नात्याने कोणत्याही संघाला स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाऊ शकला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2020 FINAL : मुंबई पाचव्यांदा ट्रॉफी जिंकणार का दिल्ली पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न साकारणार?
हैदराबादच्या पराभवानंतर विलियम्सन भावुक; म्हणाला, ‘फायनलमध्ये न पोहोचणे…’
ट्रेंडिंग लेख-
मुंबईसाठी आयपीएल जिंकलेला ‘तो’ आज मुंबईला हरवण्यासाठी उतरणार मैदानात
एकाच षटकात आयपीएलचा इतिहास बदलणारा ‘एन्रीच नॉर्किए’
मुंबईवर भारी पडणार दिल्लीचा संघ; ‘हे’ चार खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये