---Advertisement---

‘मुंबई गेली’, जोफ्रा आर्चरच्या सहा वर्षांपूर्वीच्या ट्विटने सोशल मीडियावर खळबळ

On: मंगळवार, नोव्हेंबर 10, 2020 9:43 AM
---Advertisement---

दुबईमध्ये मंगळवारी (१० नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याची कुजबूज चालू आहे. अशातच राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर चर्चेत आला आहे. नेहमी आपल्या जुन्या ट्विटद्वारे मोठमोठ्या भविष्यवाणी करणारा आर्चर यंदाही त्याच्या जुन्या ट्विटमुळेच चर्चेचा विषय ठरला आहे.

जोफ्रा आर्चरचे खळबळजनक ट्वीट
आर्चरने १६ सप्टेंबर २०१४ रोजी ट्वीट केले होते. त्यात त्याने फक्त “मुंबई गेली”, असे लिहिले होते. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. नेहमी आर्चरने काही वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरते. मग आयपीएल २०२०च्या अंतिम सामन्यातही मुंबईला दिल्लीकडून पराभव पत्करावा लागेल का? अंतिम टप्प्यावर येऊन पराभूत होण्याची नामुष्की त्यांच्यावर येईल का? असे प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करु लागले आहेत.

ट्विटमागचे कारण वेगळेच

असे असले तरी, आर्चरने सहा वर्षांपुर्वी केलेले ते ट्वीट रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघासंदर्भात नव्हे तर मुंबई शहरासंदर्भात होते. आर्चरने ज्या दिवशी ट्विट केले होते. त्या दिवशी मुंबईमध्ये खूप मुसळधार पाऊ पडला होता. त्यावेळी मुंबईवर इतकी भयानक परिस्थिती ओढावली होती की, याची चर्चा इंग्लंडपर्यंत झाली होती. त्यामुळे आर्चरने ‘मुंबई गेली’ असे ट्विट केले होते.

दिल्ली-मुंबईत होणार अंतिम सामना

दिल्ली- मुंबई संघात होणाऱ्या अंतिम सामन्यात मुंबईला पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे, तर १३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच अंतिम सामन्याचे तिकिट मिळवणाऱ्या दिल्लीला पहिल्यांदा विजेता बनण्याची उत्सुकता लागली आहे. अशात कोणता संघ अंतिम सामन्यात बाजी मारेल?, हे पाहणे उत्सुकतेचे ठरले.

महत्त्वाच्या बातम्या-

FINAL : आयपीएल २०२०ची अंतिम लढाई लढण्यासाठी मुंबई-दिल्ली आमने सामने; अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन 

IPL 2020 FINAL : मुंबई पाचव्यांदा ट्रॉफी जिंकणार का दिल्ली पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न साकारणार? 

हैदराबादच्या पराभवानंतर विलियम्सन भावुक; म्हणाला, ‘फायनलमध्ये न पोहोचणे…’

ट्रेंडिंग लेख-

मुंबईसाठी आयपीएल जिंकलेला ‘तो’ आज मुंबईला हरवण्यासाठी उतरणार मैदानात

एकाच षटकात आयपीएलचा इतिहास बदलणारा ‘एन्रीच नॉर्किए’

मुंबईवर भारी पडणार दिल्लीचा संघ; ‘हे’ चार खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---