इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या मोसमाला आबू धाबीतून प्रारंभ होणार आहे. आयपीएल 2020 चे साखळी सामन्यांचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. या मोसमातील पहिला सामना 19 सप्टेंबरला गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आबू धाबीमध्ये रंगणार आहे.
यावर्षीच्या या आयपीएलसाठी पार पडलेल्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्स संघाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यांनी 15.5 कोटी रुपये खर्च करुन ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला संघात सामील करुन घेतले आहे. तो आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याच्याबरोबरच यावर्षी कोलकाता संघाकडून ओएन मॉर्गन, टॉम बॅन्टॉन, राहुल त्रिपाठी यांसारखे खेळाडूही खेळताना दिसणार आहेत.
केकेआर आत्तापर्यंत 2012 आणि 2014 ला आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. तसेच त्यांनी 2016, 2017 आणि 2018 असे सलग तीन वर्षे प्लेऑफमध्येही स्थान मिळवले होते. आता केकेआर यावर्षी तिसरे विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने खेळतील.
केकेआर यावर्षीचा पहिला सामना 23 सप्टेबरला मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध आबु धाबी येथे होणार आहे.
आयपीएलचा हा 13 वा मोसम यावर्षी 53 दिवसांचा असणार आहे. 19 सप्टेंबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत या आयपीएल मोसमातील साखळी सामने पार पडतील. त्यानंतर प्लेऑफचे सामने सुरु होतील प्लेऑफच्या सामन्यांचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही.
असे आहे आयपीएल 2020मधील कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक-
२३ सप्टेंबर, बुधवार: कोलकाता विरुद्ध मुंबई, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२६ सप्टेंबर, शनिवार: कोलकाता विरुद्ध हैद्राबाद, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
३० सप्टेंबर, बुधवार: राजस्थान विरुद्ध कोलकाता, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
३ ऑक्टोबर: शनिवार: दिल्ली विरुद्ध कोलकाता, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
७ ऑक्टोबर: बुधवार: कोलकाता विरुद्ध चेन्नई, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१० ऑक्टोबर: शनिवार: पंजाब विरुद्ध कोलकाता , आबुधाबी , रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
१२ ऑक्टोबर: रविवार: बेंगलोर विरुद्ध कोलकाता, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१६ ऑक्टोबर: बुधवार: मुंबई विरुद्ध कोलकाता, आबुधाबी , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१८ ऑक्टोबर: शुक्रवार: हैद्राबाद विरुद्ध कोलकाता , आबुधाबी , रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
२१ ऑक्टोबर: रविवार: कोलकाता विरुद्ध बेंगलोर , आबुधाबी , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२४ ऑक्टोबर: सोमवार: कोलकाता विरुद्ध दिल्ली, आबुधाबी , दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
२६ऑक्टोबर: सोमवार: कोलकाता विरुद्ध पंजाब, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२९ ऑक्टोबर: सोमवार: चेन्नई विरुद्ध कोलकाता , दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
३० ऑक्टोबर: शुक्रवार: पंजाब विरुद्ध कोलकाता , आबुधाबी , रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
१ नोव्हेंबर: रविवार: कोलकाता विरुद्ध राजस्थान, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
आयपीएल 2020 साठी असा आहे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ-
शुबमन गिल, सिद्धेश लाड, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, रिंकू सिंग, नितीश राणा, सुनील नरेन, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, कमलेश नगरकोटी, शिवम मावी, प्रसिध्दा कृष्णा, संदीप वॉरियर, पॅट कमिन्स, ओएन मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, टॉम बॅन्टॉन, राहुल त्रिपाठी, एम सिद्धार्थ, ख्रिस ग्रीन, निखिल नाईक.