fbpx
Sunday, April 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दे घुमा के! भारतीय फलंदाज गाजवतायेत आयपीएलचा १३ वा हंगाम

September 23, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0

१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेरावा हंगामाला युएईमध्ये सुरुवात झाली आहे. पहिले चारही सामने अत्यंत अटीतटीची होऊन, हंगामाची उत्कंठा वाढली आहे. यूएईमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या चार दिवशी भारतीय फलंदाजांनी आपल्या दिमाखदार प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ऐरवी, स्पर्धेच्या सुरुवातीला काही विदेशी खेळाडू काहीतरी खास कामगिरी करून हंगामाची सुरुवात करत. मात्र, यावेळी भारतीय फलंदाजांनी आपला दबदबा राखला आहे.

पहिल्या चार सामन्यातील अशाच चार सर्वोत्कृष्ट भारतीय फलंदाजांविषयी आपण जाणून घेऊया.

१) अंबाती रायडू

२०१९ विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड न झाल्याने, अवेळी निवृत्ती स्वीकारलेला अंबाती रायडू सलग तिसऱ्या वर्षी चेन्नई सुपर किंग्जचा संघाचा सदस्य आहे. आठ वर्ष मुंबई इंडियन्सकडून खेळल्यानंतर तो २०१८ मध्ये चेन्नईच्या संघात दाखल झाला. सलामीवीर तसेच मधल्या फळीतील विश्वासू फलंदाज म्हणून दोन हंगामात मिळून त्याने चेन्नईसाठी ८८४ धावा फटकावून आपली उपयोगिता सिद्ध केली होती.

आयपीएल २०२० मध्ये आपला पूर्वाश्रमीचा संघ असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध उद्घाटनाच्या सामन्यात १६३ धावांचा पाठलाग करत असताना, चेन्नईची अवस्था तीन षटकात दोन बाद सहा अशी झाली होती. तेव्हा रायडूने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत, फाफ डु प्लेसिसच्या साथीने संघाचा डाव सावरला. रायडूने ४८ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ७१ धावांची खेळी करत चेन्नईला विजयी केले. हंगामातील पहिले अर्धशतक व पहिला सामनावीर होण्याचा मान देखील रायडूला मिळाला.

२) मयंक अगरवाल

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब व दिल्ली कॅपिटल्स या दोन तरुण कर्णधार असलेल्या संघात झालेला सामना सुपर ओव्हर पर्यंत गेला. अखेर, दिल्लीने पंजाबला सुपर ओव्हरमध्ये हरवत गुणांचे खाते उघडले.

मार्कस स्टोइनिसच्या आक्रमक फलंदाजीमुळे दिल्लीने पंजाबसमोर विजयासाठी १५८ धावांचे आव्हान ठेवले. दिल्लीच्या अनुभवी गोलंदाजीसमोर, पंजाबचे फलंदाज अडखळले व नियमित अंतराने बाद होत गेले. मात्र, सलामीवीर मयंक अगरवाल अखेरपर्यंत झुंज देत राहिला. जवळपास हरलेल्या सामन्यात त्याने जीव ओतून फलंदाजी करत, ७ चौकार व ४ षटकारांच्या सहाय्याने ६० चेंडूत ८९ धावा करत पंजाबला बरोबरी साधून दिली. कगिसो राबाडाच्या सुपर ओव्हरमधील घातक गोलंदाजीपुढे पंजाबच्या फलंदाजांना अपयश आल्याने, मयंकच्या झुंजार खेळीवर पाणी फेरले गेले.

३) देवदत्त पडिक्कल

दरवर्षीप्रमाणे यंदाही विजेतेपदाचे दावेदार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आपल्या आयपीएल हंगामाची सुरुवात विजयाने केली. आरसीबीने दिलेले १६४ धावांचे आव्हान, सनरायझर्स हैदराबादला पेलवले नाही व त्यांना दहा धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यजुवेंद्र चहल व नवदीप सैनी हे आरसीबीकडून गोलंदाजी विभागात चमकले.

आरसीबीने धावफलकावर, १६३ धावा लावण्यात युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल याचा सिंहाचा वाटा होता. देशांतर्गत क्रिकेट गाजवून आयपीएलमध्ये दाखल झालेला, कर्नाटकचा हा २० वर्षीय फलंदाज एखाद्या कसलेल्या अनुभवी फलंदाजाप्रमाणे फलंदाजी करत होता‌. देवदत्तने सलामीला येत, हैदराबादच्या भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, राशिद खान यांच्यासारख्या अनुभवी गोलंदाजांविरुद्ध निर्भिड फलंदाजी केली. देवदत्तने ४२ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ५६ धावा ठोकल्या. अनुभवी आरोन फिंचसोबत ९० धावांची सलामी देत, आरसीबीच्या विजयाचा पाया त्याने रचला.

४) संजू सॅमसन

चौथ्या दिवशी, राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला हरवत आपल्या आयपीएल हंगामाची सुरुवात विजयाने केली. बेन स्टोक्स व जोस बटलर या टी२० स्पेशालिस्ट खेळाडूंच्या अनुपस्थितत खेळताना स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन व जोफ्रा आर्चर या अनुभवी खेळाडूंनी जबाबदारी उचलत संघाला विजयी प्रारंभ करून दिला.

युवा यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर, गेली अनेक वर्ष राजस्थानसाठी खेळणारा संजू सॅमसन मैदानात उतरला. चेन्नईच्या अनुभवी गोलंदाजांची त्याने अक्षरशः पिसे काढली. रवींद्र जडेजा व पियुष चावला यांना लक्ष करत त्याने षटकारांची बरसात केली. अवघ्या ३२ चेंडूत एक चौकार व तब्बल ९ षटकार मारत त्याने ७२ धावांची तुफानी खेळी केली. संजू, स्टीव्ह स्मिथ व जोफ्रा आर्चर यांच्या योगदानामुळे, राजस्थानने २१६ धावांचा डोंगर उभा केला. जो सर करण्यात चेन्नई सुपर किंग्स अपयशी ठरले.


Previous Post

पुन्हा एकदा राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनीने घातला पंचाशी वाद, ‘हे’ आहे कारण

Next Post

‘या’ गोष्टीमुळे गमवावा लागला सामना, राजस्थान विरुद्धच्या पराभवानंतर धोनीची प्रतिक्रिया

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@SunRisers
IPL

MIvSRH: फॉर्मात असलेल्या नटराजनला संघाबाहेर ठेवण्यामागचे कारण काय? संघ डायरेक्टरनी दिले उत्तर

April 18, 2021
Photo Courtesy: Screengrab/Hotstar
IPL

क्षेत्ररक्षण करताना ट्रेंट बोल्टचा तोल गेला अन् घडलं असं काही; चाहते म्हणाले, ‘ही फील्डिंग की स्विमिंग’

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘आमच्यासोबत हे काय घडतंय काहीच कळेना,’ सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार वॉर्नरने व्यक्त केली नाराजी 

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चाहर-बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे ‘ऑरेंज आर्मी’ गारद; आयपीएलच्या मोठ्या विक्रमात मुंबईकर अव्वलस्थानी

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

सुपर संडे: आज कोहली-मॉर्गन आमने सामने, ‘अशी’ असेल आरसीबी आणि केकेआरची प्लेइंग XI

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

MIvSRH: रोहितच्या ब्रिगेडचा सलग दुसरा विजय, कर्णधाराने ‘यांना’ ठरवले मॅच विनर

April 18, 2021
Next Post

‘या’ गोष्टीमुळे गमवावा लागला सामना, राजस्थान विरुद्धच्या पराभवानंतर धोनीची प्रतिक्रिया

मुंबई-कोलकाता सामन्यामध्ये रोहित, रसलसह 'या' खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी 

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता करता येणार वानखेडे स्टेडियमची सफर

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.