सोमवारी (२८ सप्टेंबर) आयपीएल २०२० चा दहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे सुपर ओव्हर खेळण्यात आली होती. हा सामना सुपर ओव्हरमध्ये बेंगलोर संघाने जिंकला आणि मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना मुंबईने गमावला असला तरी संघातील युवा फलंदाज इशान किशनने आपल्या तडाखेबंद खेळीने सर्वांची मने जिंकली.
प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना किशनने मुंबईचा डाव सांभाळला. त्याने केवळ ५८ चेंडूंत ९९ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे मुंबई संघाला सामना बरोबरीत नेण्यास मदत केली. तरीही सुपर ओव्हरमध्ये त्याला फलंदाजीला न पाठवल्यामुळे चाहते भलतेच आश्चर्यचकित झाले होते.
यादरम्यान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडियाने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली होती. त्या व्हिडिओत किशन ९९ धावांवर बाद होत पव्हेलियनच्या दिशेने परतताना दिसत होता. या व्हिडिओला कॅप्शन देत तिने लिहिले होते की, “बेबी, मला तुझा अभिमान आहे.”
Feeling sad for Ishan Kishan today,,i m not fan of him bt ya as a cricket lover feeling so bad for him he got out at 99,No batsman deserve this💔
He is so hurting yr see this pics💔 nd i just wished he shines brightly in future in Team India 💙
Wishing Good Luck for his future❤ pic.twitter.com/0vnmpURp5M— Garima✨ (@GarimaK07402922) September 28, 2020
Well played Laddd. Ishan Kishan, 99. Feel for him. #IPL2020 #RCBvMI pic.twitter.com/GYe1H1aWXK
— Kaushik Kashyap (@CricKaushik_) September 28, 2020
किशनची गर्लफ्रेंड मिस इंडिया २०१७ ची फायनलिस्ट राहिली आहे. सोबतच २०१८मध्ये मिस सुपरनॅचरल इंडियाही राहिली आहे. किशन आणि आदितीच्या अफेअरच्या चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहेत.
किशनच्या खेळीनंतर चाहत्यांनी त्याच्यावर सोशल मीडियामार्फत कौतुकांचा वर्षाव केला.
ISHAN KISHAN❤️
Remember the Name 🔥❤️
UH Nailed it champ🔥
Unlucky by 99 bt Uh won our heart❤️❤️
My Bihari Boy @ishankishan51 ❤️
Well Done Hero❤️ pic.twitter.com/7UDTsBzJCO— Shalini Sisodiya (@Sisodiya_30) September 28, 2020
https://twitter.com/ianshrathore/status/1310652478703116288
https://twitter.com/Salmank96847850/status/1310650623617101826