---Advertisement---

आर्चर बाबा की..! ‘…तो शतक करु शकणार नाही’ गेलचे शतक हुकल्यावर आर्चरचे जुणे ट्विट व्हारल; नेटकरी अवाक्

On: शनिवार, ऑक्टोबर 31, 2020 1:10 PM
---Advertisement---

आयपीएल२०२० मध्ये शुक्रवारी(३० ऑक्टोबर) ५० वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात पंजाबचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने ९९ धावांची तुफानी खेळी केली. पण त्याचे शतक केवळ १ धावेने हुकले. त्याला जोफ्रा आर्चरने त्रिफळाचीत केले. त्यामुळे सध्या जोफ्रा आर्चरचा एक जुना ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे आर्चरच्या ट्विटमध्ये?

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर नेहमीच त्याच्या शानदार कामगिरीबरोबरच त्याच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता त्याचा एक ७ वर्षांपूर्वी २२ फेब्रुवारी २०१३ ला केलेला ट्विट व्हायरल झाला आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे की ‘मला माहित आहे जर मी गोलंदाजी करत असेल तर मी त्याला १०० धावा करु देणार नाही.’ हा ट्विट आर्चरने गेलला ९९ धावांवर बाद केल्यानंतर चर्चेत आला आहे.

याआधीही जोफ्रा आर्चरने केलेले अनेक जूने ट्विट्स व्हायरल झाले आहेत. ज्यावेळी आयपीएल २०२० मधून चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपुष्टात आले तेव्हा जोफ्रा आर्चरने केलेला ‘सीएसके नक्कीच संघर्ष करेल’, हा ट्विट व्हायरल झाला होता.

आर्चर-गेलने दाखवली खिलाडूवृत्ती –

शुक्रवारी जेव्हा गेल आर्चरच्या एका सुरेख चेंडूवर त्रिफळाचीत झाला तेव्हा त्याने रागात बॅट फेकली. पण लगेचच त्याने आर्चरबरोबर हंस्तोंदलनही केले. या कृतीचे अनेक चाहत्यांनी कौतुक केले आहे. तसेच आर्चरनेही या घटनेचा फोटो ट्विटरवर शेअर करत लिहिले आहे की ‘गेल अजूनही बॉस आहेस’

पंजाबचा झाला पराभव –

गेलने ९९ धावा करुनही पंजाबला २० षटकात ४ बाद १८५ धावाच करता आल्या होत्या. त्यानंतर राजस्थानने १७.३ षटकातच १८६ धावा करत हा सामना जिंकला. राजस्थानकडून बेन स्टोक्सने ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. तर राजस्थानकडून गोलंदाजी करताना आर्चरने २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

अब आएगा मजा!! ३ जागा, ६ संघ आणि ६ सामने; पाहा कशी आहेत प्लेऑफची समीकरणे

IPL 2020 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत केएल राहुल अव्वल क्रमांकावर कायम, तर पर्पल कॅप ‘या’ खेळाडूच्या डोक्यावर

IPL 2020 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत केएल राहुल अव्वल क्रमांकावर कायम, तर पर्पल कॅप ‘या’ खेळाडूच्या डोक्यावर

ट्रेंडिंग लेख –

सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार

…आणि १५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ खेळीने एमएस धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला

त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---