बुधवारी (२१ ऑक्टोबर) अबू धाबी येथे झालेल्या आयपीएल २०२० च्या ३९ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाला ८ विकेट्सने पराभूत केले. संघाच्या या विजयात धडाकेबाज गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका निभावली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. बेंगलोरच्या कामगिरीने प्रभावित होऊन संघाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने प्रशंसा केली आहे. सोबतच त्याने मोहम्मद सिराज एक दमदार खेळाडू असल्याचे सांगितले.
बेंगलोरच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलेल्या एका व्हिडिओत पार्थिव पटेलशी बोलताना स्टेनने म्हटले, “संघातील प्रत्येकाला शिकायचे आहे. संघातील युवा फलंदाज कर्णधार विराट कोहली आणि एबी डिविलियर्सकडून शिकत आहेत. दुसरीकडे गोलंदाजीमध्ये युवा गोलंदाज माझ्याकडून आणि ख्रिस मॉरिसकडून खूप गोष्टी शिकत आहेत. आपला अनुभव शेअर करणे खूप चांगली गोष्ट आहे.”
स्टेनने बेंगलोरकडून सुरुवातीचे दोन सामने खेळले होते. परंतु त्या सामन्यात त्याला खास कामगिरी करता आली नव्हती.
स्टेनने कोलकाताविरुद्ध शानदार गोलंदाजी केलेल्या सिराजची प्रशंसा करत म्हटले, “या सामन्यात सर्वांनी चांगला खेळ दाखवला. मी विचार केला होता की, सिराज कोलकाताविरुद्ध शारजाहमध्ये झालेल्या सामन्यात धावा दिल्यानंतर पुनरागमन करेल. आणि त्याने या सामन्यात ज्या प्रकारे कामगिरी केली, त्यावरून दिसते की, तो काय दर्जाचा खेळाडू आहे. मला त्याला शाबासकी द्यायची आहे. हा असा सामना होता, जिथे सर्वकाही तुमच्या बाजूने होते.”
बेंगलोर संघाने आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी ७ सामन्यात विजय मिळवला आहे, तर उर्वरित ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
बेंगलोर संघाचा पुढील सामना रविवारी (२५ ऑक्टोबर) दुबई येथे चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-कोलकाताच्या फलंदाजांना लोळवणाऱ्या सिराजला विराटने सामन्याआधी दिला होता ‘हा’ खास संदेश
-‘त्याला अगदी मनाप्रमाणे बाद केले’, आपल्या गोलंदाजीने केकेआरला इंगा दाखवणाऱ्या सिराजची प्रतिक्रिया
-मोहम्मद सिराजने केला कोलकाताच्या फलंदाजांचा चुराडा; नोंदवला मोठा विक्रम
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज
-आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज
-आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज






