---Advertisement---

कुठे व कधी पाहाणार आयपीएल २०२०, जाणून घ्या यावेळी होत असलेल्या आयपीएलबद्दल सर्वकाही

On: मंगळवार, ऑगस्ट 4, 2020 3:25 PM
---Advertisement---

मुंबई । रविवारी बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल यांच्यात झालेल्या बैठकीनंतर आयपीएल 2020 ची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली. त्यानुसार 13 वा मोसम युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. आयपीएल 2020 एकूण 53 दिवस चालेल, ज्यामध्ये एकूण 10 डबल-हेडर्स (एका दिवसात 2 सामने) खेळल्या जातील. यूएईच्या अबूधाबी, दुबई आणि शारजाह येथील तीन ठिकाणी ही स्पर्धा होणार असून जैव-सुरक्षित वातावरणात खेळाडूंना रहावे लागेल.

बीसीसीआयने बैठकीनंतर निर्णय घेतला आहे की कोरोना व्हायरसमुळे खेळाडू बदलण्यासाठी संघांना परवानगी आहे. त्याचबरोबर जैव-सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी एका भारतीय कंपनीशी चर्चा केली जात आहे. दरम्यान, सामन्यांची प्रसारण वेळ बदलण्यात आली आहे.

आपण आयपीएल सामने कधी पाहु शकता?

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून खेळला जाईल आणि अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळला जाईल.

सामना कोठे पाहू शकाल?

आयपीएलचे सामने स्टार स्पोर्ट्सवर प्रसारित केले जातील. या लीगचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्सच्या प्रादेशिक चॅनेलवर देखील दाखविले जातील. प्रसारणकर्त्यांमुळे आयपीएलचा अंतिम सामना 8 ऐवजी 10 नोव्हेंबर रोजी घेण्याचे ठरविले आहे. कारण दिवाळीच्या आठवडा फायद्याचा राहिल असे प्रसारकांचे म्हणने होते.

आपण सामना किती वाजता पाहू शकता?

मीडिया रिपोर्टनुसार, आयपीएलचे दुपारचे सामने भारतीय वेळेनुसार साडेतीन वाजता सुरू होतील आणि संध्याकाळचे सामने साडेसात वाजता सुरू होतील.

चिनी कंपनीबरोबरचा करार अबाधित

बीसीसीआयने चिनी कंपनीबरोबरचा करार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिवो हे आयपीएलचे मुख्य प्रायोजक आहेत तर पेटीएम, ड्रीम 11, बायजस आणि स्विगी यांनीही गुंतवणूक केली आहे. भारत आणि चीनमधील सध्याचे तणाव लक्षात घेता, बैठकीच्या अजेंड्यातील हा सर्वात मुद्दा महत्वाचा होता. त्यातून बीसीसीआयला वर्षाकाठी 440 कोटी रुपये मिळतात

महत्त्वाच्या बातम्या-

-माजी क्रिकेटर राहुल द्रविड पुन्हा आला टीम इंडियाच्या मदतीला, आता सांभाळणार ही जबाबदारी

-धोनीच्या कोरोना चाचणीबद्दल आले मोठे वृत्त, सीएकेच्या अधिकाऱ्याने दिली माहिती

-हा क्रिकेटर तर चुकून झाला राष्ट्रीय संघाचा कोच, नाहीतर मोहम्मद युसूफच होता लायक

ट्रेंडिंग लेख-

-आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या…

-वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे टॉप ५ फलंदाज….

-एकाच वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजी करणारे ५ भारतीय खेळाडू…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---