आयपीएलच्या १३ व्या हंगामातील २४ वा सामना शनिवारी(१० ऑक्टोबर) अबू धाबी येथे किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळानुसार दुपारी ३.३० वाजता सुरुवात होईल. या हंगामात आतापर्यंत कोलकाताने ५ पैकी ३ सामने जिंकले आहेत आणि २ सामने गमावले आहेत. दुसरीकडे पंजाबने ६ सामन्यांपैकी केवळ १ सामना जिंकला आहे.
शनिवारी होणाऱ्या या सामन्यादरम्यान पंजाब आणि कोलकाताच्या खेळाडूंना काही खास विक्रम करण्याची संधी आहे. त्याच विक्रमांचा आढावा आपण घेऊया.
किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघांमध्ये रंगणाऱ्या सामन्यात होऊ शकतात हे विक्रम –
– मोहम्मद शमीला आयपीएलमध्ये ५० विकेट्सचा टप्पा पूर्ण करण्यासाठी केवळ १ विकेटची गरज आहे.
– केएल राहुलला आयपीएलमध्ये १०० षटकार पूर्ण करण्यासाठी ९ षटकारांची गरज आहे.
– ओएन मॉर्गनने या सामन्यात ३ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आयपीएलमध्ये १००० धावा पूर्ण करेल.
– तसेच ओएन मॉर्गनने ६ षटकार मारले तर तो आयपीएलमध्ये ५० षटकार पूर्ण करेल.
– आंद्रे रसलने ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आयपीएलमध्ये १५०० धावा पूर्ण करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
महिला आयपीएलचे सामने होणार युएईमधील ‘या’ शहरात?
IPL 2020 : आज पंजाब-कोलकाता आणि चेन्नई-बेंगलोर येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्यांबद्दल सर्वकाही
IPL 2020: कोलकाताविरुद्धच्या सामन्यात ‘युनिवर्सल बॉस’ ख्रिस गेलचे होणार कमबॅक?
ट्रेंडिंग लेख –
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला