---Advertisement---

IPL 2020: आज पंजाब-बेंगलोर येणार आमने सामने, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही

On: गुरूवार, ऑक्टोबर 15, 2020 12:25 PM
---Advertisement---

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 31 वा सामना शारजाह येथे रात्री 7.30 ला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला जाईल. सलग 5 सामने गमावल्यानंतर पंजाब कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मागील सामन्यात पंजाबने आरसीबीचा 97 धावांनी पराभव केला होता. या हंगामातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठया फरकाने मिळवलेला विजय आहे. हा या हंगामात पंजाबने आत्तापर्यंत मिळवलेला एकमेव विजय आहे.

बेंगलोर आणि पंजाब संघांदरम्यान झालेल्या मागील 5 सामन्यांविषयी बोलायचे झाले तर बेंगलोरने 3 वेळा आणि पंजाबने 2 वेळा विजय मिळविला आहे.

या स्पर्धेत फक्त बेंगलोरविरुद्ध पंजाबने मिळवला विजय

आयपीएलच्या या हंगामात पंजाबने आतापर्यंत एकूण 7 सामने खेळले आहेत, त्यापैकी एकूण 6 सामन्यात पराभव झाला असून फक्त बेंगलोरविरुद्ध या संघाने सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा बेंगलोरचा पराभव करून पराभवाची साखळी तोडण्याचा प्रयत्न हा संघ करेल.

ख्रिस गेल खेळू शकतो या हंगामातील पहिला सामना 

युनिव्हर्सल बॉस म्हणून प्रसिद्ध ख्रिस गेल तंदुरुस्त आहे. अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे त्याला गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंजाबच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर व्हिडिओमध्ये गेल म्हणाला की, “आता प्रतीक्षा संपली आहे. आयपीएलमधील संघाचा प्रवास अद्याप संपलेला नाही. आत्ता लीगमध्ये 7 सामने शिल्लक आहेत. आम्ही सर्व सात सामने जिंकू शकतो.”

 

राहुल-मयंक यांनी ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत आघाडीवर

लीगमध्ये सर्वाधिक धावा काढण्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुल (387) आणि मयंक अग्रवाल (337) आघाडीवर आहेत. दोघांनीही हंगामात प्रत्येकी एक शतक ठोकले आहे. राहुलने बेंगलोरविरुद्ध शानदार शतक ठोकले होते.

कोहली-डिविलियर्स आहे उत्कृष्ट फॉर्ममध्ये

आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्स हे देखील फॉर्ममध्ये परत आले आहे ही संघासाठी चांगली बाब आहे. गेल्या सामन्यात डिविलियर्सने कोलकाता विरुद्ध 33 चेंडूत 73 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर कोहलीने आतापर्यंत हंगामात 2 अर्धशतकेही ठोकले आहेत.

खेळपट्टीबद्दल माहिती

शारजाहमधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे संथ खेळपट्टी असल्याने फिरकीपटूंना मदत होईल. शारजाहमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीला प्राधान्य देईल. या मैदानात खेळल्या गेलेल्या मागील 13 टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 69% आहे.

या मैदानावर खेळले गेलेले एकूण टी20 सामने : 13
प्रथम फलंदाजीचा करताना मिळालेले विजय : 9
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय : 4
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 149
दुसर्‍या डावात सरासरी धावसंख्या: 131

आरसीबीचा विजय मिळवण्याचा दर पंजाबीपेक्षा आहे अधिक

आयपीएलमध्ये आरसीबीचा विजय मिळवण्याचा दर 48.09% आहे. या संघाने आतापर्यंत लीगमध्ये 188 सामने खेळले आहेत त्यामध्ये 89 सामने जिंकले आहेत आणि 95 गमावले आहेत. त्याचवेळी 4 सामने अनिर्णीत होते. दुसरीकडे, पंजाबचा विजय मिळवण्याचा दर 45.08% आहे. पंजाबने आतापर्यंत एकूण 183 सामने खेळले आहेत, त्यामध्ये 83 सामन्यात विजय मिळवला आहे आणि 100 सामन्यात या संघाचा पराभव झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---