२००८ मध्ये इंडियन प्रीमीयर लीग या स्पर्धेला सुरुवात झाली होती. आज ही स्पर्धा टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेला जगभरात लोकप्रियता मिळाली आहे. यास्पर्धेत अनेक देशांतील स्टार क्रिकेटपटू खेळतात. या स्पर्धेचे सर्वात पहिले जेतेपद राजस्थान रॉयल्सने मिळवले होते. हे विजेतेपद माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली मिळाले होते.
त्यानंतर मात्र त्यांना विजेतेपद जिंकता आलेले नाही. त्यांना मागील वर्षी साखळी फेरीनंतर ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्याआधी त्यांनी २०१८ ला प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. यावर्षी राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथकडे सोपविण्यात आले आहे. या लेखात अशा ३ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ जे या संघाला दुसऱ्यांदा आयपीएल विजेता बनवू शकतात. राजस्थानचा या हंगामातील पहिला सामना २२ सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रंगणार आहे.
जॉस बटलर (Joss Butler)
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलर हा राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य आहे. तो राजस्थान रॉयल्सकडून सलामीला खेळतो. तो एक तुफान फलंदाजी करणारा फलंदाज आहे. इंग्लंडकडून त्याने फिनिशर म्हणून सातत्याने धावा केल्या आहेत. तो सध्या सामना जिंकणारा खेळाडू म्हणून ओळखला जात आहे.
त्याने आयपीएलमध्ये एकूण ४५ सामने खेळले असून १३८६ धावा केल्या आहेत. त्यात त्याने ९ अर्धशतके केली आहेत, तर त्याची सर्वोत्कृष्ठ धावसंख्या नाबाद ९५ आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तो राजस्थान रॉयल्स संघाला आपल्या जबरदस्त खेळीने विजेता बनवू शकतो.
संजू सॅमसन (Sanju Samson)
आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यष्टीरक्षक फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर असणारा संजू सॅमसन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य आहे. २०१७ मध्ये त्याने ही कामगिरी केली होती. त्याने ६३ चेंडूत १०२ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ५ षटकार मारले.
आता त्याच्याकडे आयपीएलमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्याच्यात सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण ९३ सामन्यात २२०९ धावा केल्यात, त्यात १० अर्धशतके आणि २ शतके ठोकली आहेत. यंदाच्या हंगामात तो राजस्थान रॉयल्स संघाला विजेता करून सुपरहिट खेळाडू ठरू शकतो.
श्रेयस गोपाळ (Shreyas Gopal)
मागील हंगामात आपल्या फिरकी गोलंदाजीची जादू दाखवणारा भारतीय गोलंदाज श्रेयस गोपाळ हा यंदाही राजस्थान रॉयल्स कडून दमदार कामगिरी करू शकतो. त्याच्या गुगलीसमोर मोठं-मोठे फलंदाजही चकमा खातात. गोपाळ राजस्थानकडून २०१८ पासून खेळत असून त्याने एकूण ३१ सामन्यात १५.५० च्या सरासरीने ३८ बळी मिळवले आहेत.
या मोसमात राजस्थानने केवळ २० लाख रुपये देऊन गोपाळला त्याच्या संघात स्थान देण्यात आले. या युवा खेळाडूने आयपीएल २०१९ मध्ये १४ सामन्यांत १७.३५ च्या सरासरीने २० बळी मिळवले होते. तसेच श्रेयस गोपाळने अनेकदा शानदार फलंदाजी करून राजस्थान रॉयल्सला संकटातून बाहेर काढले आहे. तो यंदा एका अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभावून संघाला यंदाचं आयपीएल चषक मिळवून देऊ शकतो.
२०२० मधील राजस्थान रॉयल्स संघाच्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक-
२२ सप्टेंबर २०२०
विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
२७ सप्टेंबर २०२०
विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
३० सप्टेंबर २०२०
विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
३ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
६ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध मुंबई इंडियन्स
९ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध दिल्लीची कॅपिटल्स
११ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
१४ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध दिल्लीची कॅपिटल्स
१७ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
१९ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
२५ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध मुंबई इंडियन्स
१ नोव्हेंबर २०२०
विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
राजस्थान रॉयल्सचा संघ-
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), संजू सॅमसन, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, जोस बटलर, रियान पराग, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, महिपाल लोमरर, वरुण ऍरॉन, मनन वोहरा, मयंक मार्कंडे, राहुल तेवतिया, अंकित राजपूत, रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकट, यशस्वी जयस्वाल, कार्तिक त्यागी, अँड्र्यू टाय, टॉम करन, अनुज रावत, डेव्हिड मिलर, ओशाण थॉमस, आकाश सिंग, अनिरुद्ध जोशी.