आय़पीएल २०२० आता अंतिम टप्प्यात पोहचली असून केवळ तीन सामने बाकी राहिले आहेत. क्रिकेटप्रेमींना आता विजेता कोण होणार याचे वेळ लागले आहे. जेव्हा एखादा संघ स्पर्धा जिंकतो तेव्हा त्याला किती बक्षीस रक्कम मिळते हा देखील चर्चेचा विषय असतो. अशीच चर्चा यावेळी प्रेक्षकांविना खेळविल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेच्या बक्षीस रकमांची (IPL 2020 Prize Money) होत आहे.
कोरोना व्हायरसच्या भारतात झालेल्या प्रादुर्भावामुळे यावेळी आयपीएल संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळविण्यात आली. सध्या विजेतेपदाच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स हे संघ आहेत. यातील जो संघ विजेता ठरणार आहे, त्याला गेल्यावर्षीपेक्षा कमी बक्षीस रक्कम मिळणार आहे.
आयपीएल २०१९ मधील विजेत्यापेक्षांही मिळणार कमी पैसे
आयपीएल २०१९च्या तुलनेत आयपीएल २०२०च्या बक्षीस रकमेत मोठी कपात करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने हा निर्णय़ घेतला आहे. याची घोषणा बीसीसीआयने मार्च २०२०मध्येच केली होती.
विजेत्या- उपविजेत्या संघांच्या बक्षीस रकमांतही केली कपात
आयपीएल २०१९मध्ये विजेत्या मुंबई इंडियन्स संघाच २० करोड रुपये मिळाले होते. परंतू यावेळी जिंकणाऱ्या संघाला केवळ १० कोटी रुपये मिळणार आहेत. अंतिम सामन्यात विजयी होणाऱ्या संघाला विजेतेपदाची ट्रॉफी व १० कोटी रुपयांचा चेक दिला जाणार आहे. यावेळी उपविजेत्या संघाला ६.२५ कोटी रुपये मिळणार आहे. उपविजेत्या संघाला आयपीएल २०१९मध्ये तब्बल १२.५० कोटी रुपये मिळाले होते.
प्ले ऑफमध्ये तिसऱ्या व चौथ्या स्थानावर राहणाऱ्या संघाचेही बक्षीस केले कमी
यावेळी प्ले ऑफमधून बाहेर पडणाऱ्या संघांना ४.३७५ कोटी प्रत्येकी मिळणार आहेत. आयपीएल स्पर्धेतील ही बक्षीसांची रक्कम तशी खेळाडूंना लिलावात मिळालेल्या रकमेपेक्षा तशी कमीच वाटते. पंरतू बीसीसीआय व आयपीएलच्या संघांची खरी कमाई बक्षीसांतून होत नसून ती स्पॉन्सरशीपमधून होते. बक्षीस रकमेत ५० टक्के कपात होणार असल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मार्च महिन्यातच संघमालकांना कळवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-ब्रेकिंग ! गौतम गंभीर सेल्फ आयसोलेट, स्वतः ट्विट करून दिली माहिती
-ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी कोहलीचे मोठे भाष्य, ‘या’ कारणामुळे दौरे मोठे नसावेत
-“वैयक्तिक कीर्तिमान महत्वाचे परंतु…”, दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमारची खास प्रतिक्रिया