दुबई येथे गुरुवारी (५ नोव्हेंबर) झालेल्या आयपीएल २०२०च्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सने ५७ धावांनी पराभूत केले होते. असे असले तरीही अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी दिल्लीकडे क्वालिफायर २ सामन्याच्या रूपात संधी आहे. रविवारी (८ नोव्हेंबर) दिल्ली संघ क्वालिफायर २ मध्ये सनरायझर्स हैदराबादचा सामना करणार आहे. अशामध्ये दिल्लीचा धडाकेबाज फलंदाज पृथ्वी शॉला अपेक्षित कामगिरी करता आली नाही, तो सपशेल फ्लॉप ठरला. त्यामुळे त्याला हैदराबादविरुद्धच्या सामन्यातून बाहेर बसवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेऊ शकते.
शॉची आयपीएल २०२०मधील निराशाजनक कामगिरी
पृथ्वी शॉने आयपीएल २०२०मध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याने या हंगामात १३ सामने खेळले आहेत. या त्याने १३६.५२ च्या स्ट्राईक रेटने केवळ २२८ धावा केल्या आहेत. मागील ८ सामन्यांमधील शॉची सर्वोत्तम धावसंख्या ही १९ इतकी आहे. प्रत्येक सामन्यात लवकर बाद होत असल्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर धावा करण्याचा दबाव येतो. त्यामुळे संघ व्यवस्थापन त्याला संघातून वगळू शकते.
संघाच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय
तरीही दिल्ली संघाकडे शॉच्या जागी दुसरा खेळाडूही नाही. शिखर धवन आणि अजिंक्य रहाणेची सलामी जोडीचा प्रयोग याआधीही फसला आहे. इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, हैदराबादविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात शिखर धवन आणि मार्कस स्टॉयनिसला सलामीला पाठवण्याची शक्यता आहे.
धवनबद्दल बोलायचं झालं, तर त्याने या हंगामात दिल्ली संघासाठी सर्वाधिक ५२५ धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या सलग २ शतकांचाही समावेश आहे. सोबतच स्टॉयनिसने २६.१६ च्या सरासरीने १५ सामन्यात ३१४ धावा कुटल्या आहेत.
स्टॉयनिसने या धावा करताना ३ अर्धशतकेही ठोकली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षक रिकी पाँटिंग स्टॉयनिसच्या शानदार फॉर्मने प्रभावित आहे. सोबतच ते त्याला धवनसह सलामीला संधी देण्यासाठी तयार आहेत. यावर शनिवारी (७ नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्सच्या होणाऱ्या संघ बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
-ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी पृथ्वी शॉच्या खराब फॉर्मबद्दल माजी दिग्गजाने दिली तिखट प्रतिक्रिया
-‘सेहवागचा आदर्श डोळ्यापुढे ठेव,’ खराब फॉर्ममध्ये असलेल्या पृथ्वी शॉला माजी क्रिकेटरचा मोलाचा सल्ला
-पृथ्वी शॉ नाही तर आता ‘हा’ धुरंधर करणार ओपनिंग; प्लेऑफपुर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय






